नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महाराष्ट्र राज्य रिपब्लिकन संघर्ष आघाडीच्या जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी खासदार हेमंत गोडसे यांची कार्यालयात भेट घेतली. मुख्यमंत्र्यांच्या कामकाजावर आम्ही समाधानी असून बाळासाहेबांची शिवसेना पक्षाबरोबर आम्ही काम करण्यास तयार आहोत. कार्यकर्ते ,पदाधिकारी यांच्याशी लवकरच सविस्तर चर्चा करून अधिकृत पाठिंबा आम्ही बाळासाहेबांच्या शिवसेनेला जाहीर करणार असल्याची ग्वाही संघर्ष आघाडीच्या जिल्हास्तरीय नेत्यांनी खासदार गोडसे यांना दिले आहे.
रिपाईचे वरिष्ठ नेते हवी त्यावेळी कोणाशीही युती करतात तर कोणाशी युती तोडतात. नेत्यांच्या या भूमिकेमुळे दुसऱ्या फळीतील पदाधिकाऱ्यांचे सततच नुकसान होत आहे. परिणामी रिपाई चळवळीचे मोठे नुकसान होत आहे. नेत्यांच्या या धरसोड वृत्तीमुळे रिपाई पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे रिपाईच्या विविध गटातील दुसऱ्या फळीतील नेत्यांनी रिपब्लिकन संर्घष आघाडीची स्थापना केली आहे.नाशिक जिल्ह्यातील रिपब्लिकन संघर्ष आघाडीच्या पदाधिकाऱ्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे काम करण्याची पद्धत आणि कार्यकर्त्यांना बळ देण्याची वृत्ती भावल्याने त्यांनी आज खासदार हेमंत गोडसे यांची कार्यालयात भेट घेतली.
भेटी दरम्यान रिपब्लिकन संघर्ष आघाडीच्या नेत्यांनी खासदार हेमंत गोडसे यांच्याकडे रिपाई चळवळी विषयीची व्यथा मांडली.रिपाई नेते कधीही कोणतेही पक्षाशी युती करतात तर असलेली युती तोडतात. नेत्यांच्या अशा वृत्तीमुळे चळवळ कमकुवत होत असून दुसऱ्या फळीतील नेत्यांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे.यातूनच आम्ही रिपब्लिकन संघर्ष आघाडीची स्थापना केली असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बाळासाहेबांची शिवसेना पक्षात काम करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती रिपब्लिकन संघर्ष आघाडीच्या नेत्यांनी खासदार गोडसे यांना दिले आहे.राज्यातील रिपाईच्या विविध गटातील दुसऱ्या फळीतील नेत्यांची सविस्तर चर्चा करून आम्ही मुख्यमंत्री शिंदे यांच्या पक्षाला जाहीर पाठिंबा देणारा असल्याची माहिती यावेळी आघाडीच्या नेत्यांनी खासदार गोडसे यांना दिली आहे.या नेत्यांमध्ये प्रकाश पगारे, मदन शिंदे,संजय रोकडे,भिवानंद काळे,सुनील कांबळे,दिलीप अहिरे,भरत रोकडे,किशोर गांगुर्डे, अतुल भावसार,संजय सानप, लढढाभाई शेख आदी नेत्यांचा समावेश होता.