नाशिक – शिवसेनेत आमदारांनी बंड केल्यानंतर आता खासदारही बंड करणार असल्याची चर्चा रंगत आहे. या चर्चा रंगत असतांनाच नाशिक लोकसभेचे शिवसेनेचे खासदार हेमंत गोडसे यांनी मुंबई येथे शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची मातोश्रीवर सदिच्छा भेट घेतली. यावेळी त्यांनी उध्दव ठाकरे यांना श्री त्रंबकराजांच्या मुकुटाची प्रतिमा प्रदान केली. या भेटीवेळी त्यांच्यासमवेत, खा. अरविंद सावंत साहेब, खा. ओमराजे निंबाळकर, बंडू नाना जाधव, माजी नाशिक जिल्हाप्रमुख जयंत दिंडे हे उपस्थित होते. त्यांच्या या भेटीमुळे खासदार हेमंत गोडसे कुणाबरोबर ? या सर्वांच्या प्रश्नांना उत्तर मिळाले आहे.