नाशिक – पाण्यापोटी आदिवासी भागातील महिलांची होणारी पायपीट थाबविण्यासाठी खासदार हेमंत गोडसे यांनी आपल्या स्थानिक विकास निधीतून त्रंबकेश्वर तालुक्यातील शेंद्रीपाडा येथे उभारलेल्या सोलर डयुअल वॉटर पंपीग प्रकल्पाचे आज खासदार गोडसे यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा संपन्न झाला. काही दिवसापूर्वी सोशल मिडीयावर शेंद्रीपाडा येथील गाजलेल्या पिण्याच्या पाण्याच्या समस्येची खा.गोडसे यांनी दखल घेत सोलर डयुअल वॉटर पंपीग प्रकल्पाची उभारणी केली आहे . या प्रकल्पामुळे शेंद्रीपाडा येथील महिलांची पाण्यासाठी होणारी कुचंबना थांबणार असल्याने महिला वर्गात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकल्पामुळे पाण्यापोटी महिलांची होणारी पायपीट निश्चितच थांबणार असल्याचा विश्वास यावेळी खा.गोडसे यांनी व्यक्त केला.
शेंद्रीपाडा हा आदिवासी पाडा त्रंबकेश्वर तालुक्यातील खरशेत ग्रामपंचायत हद्दीत आहे. गेल्या अनेक वर्षापासून येथील महिला गाव शिवारातील झज्यांमधून पिण्यासाठी पाणी आणत असे . पाडयावरील सतत खंडीत होणारा विजपुरवठा तसेच उपसा पाणी साठविण्यासाठी व्यवस्था नसल्याने येथील महिलांना हंडाभर पाण्यासाठी पायपीट करावी लागत असे काही दिवसांपूर्वी या पाडयावरील महिलांची पाण्यासाठी होणारी पायपीटीचे विदारक दृश्य सोशल मिडियामुळे समोर आली होते. पाण्यासाठी महिलांची होणा – या कुचंबणेमुळे पर्यटन मंत्री आदित्यजी ठाकरे व्यथीत झाले होते . स्थानिक लोक प्रतिनिधींनी शेंद्रिपाडा येथील पाणी टंचाईच्या प्रश्नांकडे लक्ष घालण्याचे आदेश नामदार आदित्यजी ठाकरे यांनी दिले होते. नामदार ठाकरे यांचा आदेश येताच खा.गोडसे यांनी शेंद्रीपाडा येथील नागरिकांकडून माहिती घेत पाणी टंचाईची समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते. आपल्या स्थानिक विकास निधीतून खा . गोडसे यांनी साडे चार लाखांचा निधी उपलब्ध करून देत या ठिकाणी सोलर डयुअल वॉटर पंपीग प्रकल्पाची निर्मीती केली आहे. या प्रकल्पांचा आज लोकार्पण सोहव्य पार पडला . यावेळी सेनेचे तालुका प्रमुख संपत चव्हाण , समाधान बोडके , ग्रीन ग्रीड प्रायवेट लिमिटेड चे सागर देसाई , राजाभाऊ गायधनी , सरपंच विट्ठल दळवी , रघुनाथ गांगोडे , पांडु दाहवड , मिथून राउत , निवृत्ती धुम , सुरेश राउत , अकलात शेख , राहुल शार्दुल , नितीन लाखन , प्रकाश बोरसे , वामन खरपडे , अशोक उपडे , विष्णू बेंडकोळी , पांडुरंग बोरसे , अशोक लाघे आदि सह नागरीक मोठया संख्येने उपस्थित होते .