खा . गोडसे यांच्या पाठपुराव्याला यश
नाशिक -शहरातील राष्ट्रीय छात्रसेनेच्या विद्यार्थ्यांना स्वतःच्या इमारतीत प्रशिक्षण मिळावे यासाठी खासदार हेमंत गोडसे यांच्या सततच्या पाठपुराव्यांना यश आले आहे .शरणपूररोडवरील हॉटेल इमरॉल्ड पार्क समोरील केंद्र शासनाचा जागेचा राष्ट्रीय छात्रसेना इमारतीच्या बांधण्याच्या प्रस्तावाला शासनाची मान्यता मिळाली असून या कामासाठी सुमारे १० कोटी रूपयांचा निधीला अंदाजपत्रकाला मान्यता दिलेली आहे. पैकी ६ कोटी रूपयांच्या निधी इमारतीच्या बांधकामासाठी लगेचच वितरीत करण्याच्या निर्णयाला वित्त विभागाने मान्यता दिली आहे .शासनाच्या या निर्णयामुळे लवकरच शहरातील राष्ट्रीय छात्रसेनेच्या प्रशिक्षणार्थींना स्वःताच्या इमारतीत प्रशिक्षण मिळणार असल्याने राष्ट्रीय छात्रसेनेच्या प्रशिक्षणार्थ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे .
गेल्या अनेक वर्षापासून राष्ट्रीय छात्रसेनेचे प्रशिक्षणार्थी कॉलेज रोड वरील एचपीटी महाविद्यालयांच्या भाडयाच्या इमारतीत प्रशिक्षण घेत आहेत. शरणपूररोड वरील हॉटेल इम्पार्ल्ड पार्क समोरील केंद्र शासनाच्या जागेवर राष्ट्रीय छात्रसेनेची जागा असून येथे इमारत उभारणीचा प्रस्ताव अनेक वर्षापासून प्रलंबित आहे . राष्ट्रीय छात्र सेनेच्या प्रशिक्षणार्थीनी गेल्या काही महिन्यांपासून खासदार गोडसे यांच्याकडे तगादा लावला होता. विद्यार्थ्यांची मागणी न्यायिक असल्याने खा.गोडसे यांनी शालेय शिक्षण व किडा विभागाकडे सततचा पाठपुरावा सुरू केला होता .या प्रयत्नांना आता यश आले असून राष्ट्रीय छात्र सेनेच्या स्वःताच्या जागेवर प्रशिक्षणार्थीसाठी इमारत बांधण्याच्या प्रस्तावाला आज मान्यता दिली आहे .यासाठी सन २०२१-२२ च्या अंदाजपत्रक सुमारे ११ कोटी रूपयांच्या निधीला मान्यता मिळाली असून पैकी ६ कोटी रूपयांच्या निधी इमारतीच्या बांधकामासाठी लगेचच वितरीत करण्याचा निर्णय वित्त विभागाने घेतला आहे . या निधीतुन प्रशासकिय इमारत , पार्किंग सुविधा , पाणी सुविधा , इलेक्ट्रीफिकेशन , ड्रेनज , स्नानगृह , प्रसाधन गृह , पाक गृह , मोटार शेड , कंपाऊड / फेन्सिंग व इत्यादी कामे करण्यात येणार आहे . खासदार गोडसे यांच्या प्रयत्नांमुळे राष्ट्रीय छात्र सेनेच्या इमारतीच्या प्रस्तावाला मान्यता आणि निधी उपलब्ध झाल्याने प्रशिक्षणार्थीकडून खा.गोडसे यांचावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे .