खा हेमंत गोडसे यांना हवाई वाहतूक मंत्रालयाची ग्वाही
नाशिक- राज्यात नाशिक जिल्हा हा कृषीप्रधान जिल्हा म्हणून ओळखला जात आहे . जिल्ह्यातील सत्तर टक्के लोकांचा उदरनिर्वाह शेतीव्यवसायावर चालतो. यातून जिल्हयातील शेतक – यांचा शेतीमाल कमीतकमी वेळेत देशातील विविध राज्यांसह परदेशात जावा यासाठी खा गोडसे यांच्याकडून केंद्रीय उडाण मंत्रालयाकडे सुरू असलेल्या मागणीच्या प्रयत्नांना आता यश येवू लागले आहे. ओझर विमानतळाचा कृषी उडाण योजनेत समावेश केल्यास जिल्हयासह उत्तर महाराष्ट्रातील शेतक – यांच्या विकासाला चालना मिळणार असल्याचे खा. हेमंत गोडसे यांनी उडाण मंत्रालयाच्या निदर्शनास आणून दिले होते. खा गोडसे यांच्या मागणीवर केंद्र सरकार सकारात्मक असून लवकरच ओझर विमानतळाचा कृषी उडाण योजनेत समावेश करण्यात येणार असल्याची ग्वाही केंद्रीय मंत्री ज्योतीरादित्य सिंदिया यांनी खा. गोडसे यांना दिली आहे .
जिल्हयातील शेतीमाल परराज्यात जावा यासाठी दीड वर्षापूर्वी खा गोडसे यांच्या पाठपुराव्यामुळे देवळाली कॅम्प येथील किसान रेल सुरू करण्यात आलेली आहे . सुरूवातीला आठवडयातून दोन दिवस सुरू झालेली किसान रेल्वे शेतक – यांकडून मिळणारा प्रतिसाद पाहता आता तीन दिवस धावू लागली आहे . जिल्हयात मोठया प्रमाणावर शेतीमाल उत्पादित होत असून यात कांदा , भाजीपाला तसेच फळांचा मोठया प्रमाणावर समावेश आहे . शेतीमालात काही नाशवंत शेतीमालाचा समावेश असल्याने अवघ्या काही तासांमध्ये विक्रीसाठी शेतीमाल देशातील विविध राज्यांसह परदेशात पोहचविता यावा यासाठी खा गोडसे यांनी किसान रेल पाठोपाठ हवाई सेवेच्या उपलब्धतेसाठी काही महिन्यांपासून प्रयत्न सुरू केलेले होते . या प्रयत्नांना आता यश मिळणार असल्याची चिन्हे दिसू लागली आहे .
खा.गोडसे यांनी नुकतीच पुन्हा केंद्रीय उडाण मंत्री ज्योतीरादित्य सिंदिया व उडाण मंत्रालयाच्या उपसचिव उषा पाधी यांची मंत्रालयात जात भेट घेतली . जिल्हयात मोठ्या प्रमाणात शेतीमाल उत्पादित होत असून परराज्यात आणि परदेशात विक्री व्यवस्थेसाठी वाहतुक व्यवस्था जलद गतीने तसेच वेळेत उपलब्ध असल्यास नुकसान टळेल . शेतक – यांच्या शेतीमालाला चांगला भाव मिळून शेतक – यांची निश्चितच आर्थिक भरभराट होण्यास मदत होईल आदी ठळक मुद्दे गोडसे यांनी नामदार सिंदिया आणि उषा पाधी यांच्यासह मंत्रालयातील उच्च पदस्थ अधिका – यांच्या लक्षात आणून दिले. आपली शेतक-यांविषयीची तळमळ आणि शेतीमालाच्या वाहतुकीसाठी हवाई सेवा उपलब्ध करून देण्याची मागणी न्यायिक असून यासाठी लवकरच ओझर विमानतळाचा कृषी उडाण योजनेअंतर्गत समावेश करण्यात येणार असल्याची ग्वाही उडाण मंत्रालयाने खा गोडसे यांना दिली आहे . ओझर विमानतळाचा समावेश कृषी उडाण योजनेत झाल्यास जिल्हयासह उत्तर महाराष्ट्रातील शेतक – यांच्या आर्थिक प्रगतीला चालना मिळणार असून शेतीमाल सुरक्षित आणि अत्यंत कमीतकमी वेळेत विविध राज्यांसह परदेशात पोहचविणे शक्य होणार असल्याची माहिती खा.गोडसे यांनी दिली आहे. या सुविधेसाठी शेतक – यांना वाहतुकीच्या भाडयावर शासनाकडून विशेष अनुदानही मिळणार असल्याचे खा. गोडसे यांनी स्पष्ट केले आहे.