गुरूवार, नोव्हेंबर 13, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

द्वारका-दत्तमंदिर उड्डाणपुल, मेट्रो, सुरत-चेन्नई महामार्गाबाबत खा. गोडसे यांनी अधिका-यांना केल्या या सुचना

ऑगस्ट 28, 2021 | 2:27 pm
in स्थानिक बातम्या
0
Dwarka Datmandir Udan Pul 2

नाशिक : भारतमाला योजनेत नुकताच द्वारका-दत्तमंदिर दरम्यानच्या प्रस्तावित उड्डाणपुलाचा समावेश झाल्याने निधीचा मार्ग मोकळा झाला आहे. द्वारका-दत्तमंदिर उड्डाणपुल आणि या दरम्यानची मेट्रो लाईन हे दोन ही प्रकल्प एकत्रितपणे उभारण्याचा निर्णय झाला आहे. द्वारका-दत्तमंदिर उड्डाणपुल, मेट्रो आणि सुरत-चेन्नई महामार्ग हे तीनही प्रकल्प शहरसाठी अंत्यत महत्त्वाचे असून भविष्यातील अनेक पिढ्यांना उपयुक्त ठरणारे आहेत. त्यामुळे द्वारका-दत्तमंदिर उड्डाणपुल, मेट्रोसह सुरत-चेन्नई महामार्ग या तीनही महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचा डीपीआरमध्ये त्रुटी राहू नये, यासाठी सुक्ष्म नियोजन करुन प्रकल्पाची भक्कमपणे उभारणी करावी असे आवाहन खा. गोडसे यांनी केले आहे.

खासदार हेमंत गोडसे यांच्या प्रयत्न आणि सततच्या पाठपुराव्यामुळे उभारल्या जाणारे द्वारका-दत्तमंदिर उड्डाणपुल, मेट्रो आणि सुरत-चेन्नई महामार्ग हे प्रकल्प शहरासाठी वरदान ठरणारे आहेत. डीपीआर पूर्ण होण्याअगोदर या तीनही प्रकल्पांची माहिती केंद्राई इंजिनियर असोशिएशनसह विविध संस्थाच्या पदाधिकाऱ्यांना मिळावी यासाठी खासदार गोडसे यांच्या पुढाकाराने संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची उंटवाडी येथील अभियंता कार्यालयात प्रकल्पांचे सादरीकरणाचे आयोजन केले होते. यावेळी मार्गदर्शन करतांना खा. गोडसे यांनी वरील आवाहन केले. यावेळी व्यासपीठावर नॅशनल हायवेचे प्रकल्प अधिकारी बी.एस. साळुंके, आकार अभिनव एजन्सीचे विनय शर्मा, दिलीप शुक्ला, मेट्रोचे विकास नागुलकर, संकेत केळकर, केंड्राईचे रवि महाजन, अनंत जातेगावकर आदी मान्यवर उपस्थित होते.

चेन्नई-सुरत या महामार्गाचा प्रारंभ पेठ तालुक्यातून होत असून नाशिक, पेठ, सुरगाणा, दिंडोरी, नाशिक, निफाड, सिन्नर या तालुक्यांतील ६९ गावांमधून हा महामार्ग जाणार आहे. प्रस्तावित महामार्ग सहा पदरी असणार आहे. या महामार्गामुळे सुरत-नाशिक हे अंतर अवघे दोन तासांवर येणार आहे. सुमारे पाच किलोमीटर महामार्ग नाशिक महानगरपालिका हद्दीतून जाणार असून ७० मीटर रुंदीचा असणार आहे. या महामार्गामुळे पेठ, सुरगाणा तालुके पर्यटनसाठी विकसित होणार आहेत. महामार्गाच्या दोन ही बाजुस ७.५ मीटरचा सर्व्हिस रोड असणार आहे. महामार्गावर वळण खूपच कमी असणार असल्याने विविध शहरांमधील अंतर कमी होणार असून वेळ आणि इंधनाची मोठी बचत होणार आहे. जिल्ह्यात दोन ठिकाणी टेनेल तर उमराणे, आडगाव, ओढा, वावी या चार ठिकाणी इंटर चेंजर असणार असून जितक्या किलोमीटरचा रस्ता वापराल तितकाच टोल भरण्याची व्यवस्था असणार आहे.

मेट्रो प्रकल्पाला मंजुरी मिळाली त्या दरम्यानच द्वारका-दत्तमंदिर रस्त्याचा समावेश भारतमाला योजनेत झाला हा ही एक मोठा योगायोग जुळून आला असल्यानेच दोनही प्रकल्पांचे कामे एकत्रित करण्याचा निर्णय झाला आहे. या तीनही स्तरांमधील अंतर सतरा फुट उंचीचे असणार आहे. मेट्रो आणि सुरत-चेन्नई महामार्गाचा आराखडा अंतिम टप्यात असून लवकरच आराखडा पूर्ण होणार असल्याची माहिती नॅशनल महामार्गाचे व्यवस्थापक दिलीप पाटील यांनी दिली. वरील तीनही प्रकल्पांचे आराखडे पूर्ण झाल्यावर पुन्हा एकत्रित बैठक घेवून काही सूचना असल्यास त्या सूचनांचा समोवश करण्यात येणार असल्याचे मेट्रो आणि नॅशनल हायवे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. या बैठकीप्रसंगी खा. गोडसे यांच्यासह उमेश वानखेडे, सचिन, बागड, सुशिल बागड, अनिल आहेर, अतुल शिंदे, रसिककुमार बोथरा, मनोज खिवंसरा, सागर शहा, आनंत ठाकरे, विजय चव्हाणके यांच्यासह मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.

प्रकल्प दृष्टिक्षेपात
द्वारका-दत्तमंदिर या दरम्यानच्या उड्डाणपुलाची रुंदी ४५ मीटर असणार आहे. या उड्डाणपुलाच्या दरम्यान सात ठिकाणी जक्शंन असणार असून जक्शंनवर चढण्या, उतरण्यासाठी ट्रॅम्प असणार आहेत. उड्डाणपुल चार लेनचा असणार असून दोन्ही बाजुचा सर्व्हिस रोड ५.५ तर रॅम्प ७.५ मीटरचा असणार आहे. सुमारे हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. द्वारका-दत्तमंदिर या दरम्यान तिहेरी वाहतूक व्यवस्था असणार आहे. रस्ता, त्यावर उड्डाणपुल त्यावर त्यावर मेट्रो असे नियोजन असणार आहे. वेळ आणि खर्च कमी व्हावा, यासाठी उड्डाणपुल आणि मेट्रो या दोनही प्रकल्पांचे काम एकत्रित करण्याचा निर्णय झाला आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नाशिक – हेल्मेट न घातला पेट्रोल घेणे पडले महागात; ७२ जणाचे लायसन्स होणार निलंबित

Next Post

धुळे जिल्ह्यातील साक्री येथील एसटी कर्मचाऱ्याची आत्महत्या; कर्मचा-यांचे आंदोलन

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा गुरुवारचा दिवस… जाणून घ्या, १३ नोव्हेंबरचे राशिभविष्य…

नोव्हेंबर 12, 2025
thandi
महत्त्वाच्या बातम्या

या शहरात तीव्र थंडीची लाट… असा आहे हवामानाचा अंदाज…

नोव्हेंबर 12, 2025
annasaheb
इतर

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे कामकाज बंद?

नोव्हेंबर 12, 2025
Untitled 39
मुख्य बातमी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या नाशकात… कुंभमेळ्याच्या या विकासकामांचे होणार भूमीपूजन…

नोव्हेंबर 12, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा बुधवारचा दिवस… जाणून घ्या, १२ नोव्हेंबरचे राशिभविष्य…

नोव्हेंबर 11, 2025
crime1 1
इतर

नाशिक शहरात वाहनचोरी आणि घरफोडीचे सत्र सुरूच… एकाच दिवसात एवढे गुन्हे दाखल….

नोव्हेंबर 11, 2025
IITF 2025
महत्त्वाच्या बातम्या

दिल्लीत होणार भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळा… अशी आहेत त्याची वैशिष्ट्ये…

नोव्हेंबर 11, 2025
WhatsApp Image 2025 11 11 at 4.23.33 PM
महत्त्वाच्या बातम्या

राष्ट्रीय जल पुरस्कारांमध्ये महाराष्ट्र सर्वोत्कृष्ट राज्य… या विजेत्यांची झाली घोषणा…

नोव्हेंबर 11, 2025
Next Post
IMG 20210828 WA0165 e1630144629675

धुळे जिल्ह्यातील साक्री येथील एसटी कर्मचाऱ्याची आत्महत्या; कर्मचा-यांचे आंदोलन

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011