इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – रामनवमीच्या मिरवणुकीत दगडफेक करणाऱ्यांबाबत मध्य प्रदेशातील शिवराज सिंह सरकार अतिशय आक्रम झाले आहे. त्यामुळेच दगडफेक करणाऱ्यांच्या घरावर थेट बुलडोझर चालविण्यात आला आहे. खरगोन येथे रामनवमीच्या दिवशी मिरवणुकीत दगडफेक झाली त्यानंतर मोठा हिंसाचार झाला. या दुर्घटनेत २० पोलिसही जखमी झाले होते. याची गंभीर दखल सरकारने घेतली. संबंधितांवर कारवाईचे निर्देश दिल्यानंतर जिल्हा प्रशासनही सक्रीय झाले. त्यामुळेच खरगोन शहरातील अत्यंत संवेदनशील असलेल्या छोटा मोहन टॉकीज परिसरात प्रशासनाने जोरदार कारवाई केली. यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त येथे होता. मोठ्या सुरक्षा व्यवस्थेत आरोपींच्या घरांवर बुलडोझर चालविण्यात आला.
दरम्यान, बलात्कारी आणि बलात्काऱ्यांना मदत करणाऱ्यांवर शिवराज सिंग सरकारचे बुलडोझर चालत नाहीत, असा टोला काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांनी लगावला आहे.








