नवी दिल्ली – कोरोनाच्या संकटात सर्वसामान्यांना फॅबीफ्लू गोळ्यांचे वाटप करणाऱ्या भाजप खासदार गौतम गंभीर यांना दिल्ली उच्च न्यायालयाने जोरदार फटकारले आहे. या गोळ्या देण्यासाठी तुमच्याकडे परवाना आहे का, अशी विचारणा न्यायालयाने केली आहे. तसेच, या गोळ्यांच्या वाटपापूर्वी गंभीर यांनी डॉक्टरांचा सल्ला घेतला होता की तेच डॉक्टर आहेत, असा सवालही न्यायालयाने उपस्थित केला आहे. गंभीर यांचा उद्देश कितीही चांगला असला तरी त्यांच्या कृतीचे समर्थन होऊ शकत नाही. इतक्या मोठ्या प्रमाणात गंभीर यांच्याकडे औषधांचा साठा असल्याबद्दलही न्यायालयाने आश्चर्य व्यक्त केले आहे. एकीकडे सर्वसामान्यांना औषधे मिळत नाहीत आणि दुसरीकडे गंभीर हे या औषधाचे वाटप करीत आहेत, असे गंभीर यांच्या वकीलाने न्यायालयास सांगितले. त्यावर न्यायालय म्हणाले की, काम चांगले आणि पद्धत चुकीची आहे. गंभीर हे गेल्या २५ एप्रिलपासून त्यांच्या संपर्क कार्यालयात फॅबीफ्लू गोळ्यांचे वाटप करीत होते.