इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – मध्य प्रदेशातील जबलपूरमधून एक हृदयद्रावक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. ८ महिन्यांच्या गरोदर सुनेचे पोट कापून सासरच्यांनी अर्भकाला बाहेर काढले. हे काम स्मशानभूमीतील एका सफाई कामगाराने केल्याचे सांगण्यात येत आहे. त्याने मृतदेहाचे पोट ब्लेडने फाडून पोटातून मुलाचा मृतदेह बाहेर काढला. त्यानंतर सुनेवर अंत्यसंस्कार करण्यात आले. आणि मुलाचा मृतदेह देखील स्मशानभूमीत स्वतंत्रपणे पुरण्यात आला.
स्मशानभूमीत सूनेचा मृतदेह जाळण्यापूर्वी सासरच्यांनी महिलेचे ब्लेडने पोट फाडले. पोटात मूल जिवंत आहे की मृत आहे हे त्यांना पाहायचे होते. मात्र बालकही मृत झाल्याचे समजताच त्याचा मृतदेहही पुरण्यात आला. जबलपूरमधील बारेलाच्या पडवार येथे राहणाऱ्या राधा लोधीचा विवाह २४ एप्रिल २०२१ रोजी पानगर येथील गोपी पटेलसोबत झाला होता. लग्नानंतर राधाचा सासरच्या मंडळींकडून छळ केला जात होता.
१७ सप्टेंबर रोजी तिचा संशयास्पद अवस्थेत मृत्यू झाला. ही माहिती राधाच्या माहेरकडच्यांना देण्यात आली नाही. मात्र माहिती मिळताच राधाचे नातेवाईक घटनास्थळी पोहोचले, मात्र सासरच्यांनी शवविच्छेदन करण्यास नकार दिला. विशेष म्हणजे, सूनेच्या मृतदेहासोबत हे क्रूर कृत्य करत असताना सासरच्यांनी मोबाईलवर व्हिडिओ बनवला. जो सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये दिसते की, एक पुरुष मृत गर्भवती महिलेचे पोट ब्लेडने फाडत आहे आणि त्यातून मृत नवजात अर्भक बाहेर काढत असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. ही घटना दीड महिन्यां पूर्वीची असल्याचे सांगण्यात येत आहे.
जिल्हा प्रशासन व पोलीस प्रशासनाला याची माहिती मिळताच एकच खळबळ उडाली. कुटुंबीयांचा आरोप आहे की, मृत्यूच्या एक दिवस आधीही राधाचा सासरच्यांसोबत वाद झाला होता. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी कुटुंबीयांनी केली आहे. त्याचवेळी हा व्हिडिओ समोर आल्यानंतर मृताच्या नातेवाईकांनी एसपी कार्यालय गाठून संपूर्ण प्रकरणाची माहिती दिली आणि न्याय मिळावा, अशी विनंती केली.
मृत सूनेची आई गौराबाईने तक्रार केली की, लग्न झाल्यापासून सासरचे लोक हुंड्यासाठी दुचाकीची मागणी करत होते. मुलगी राधा ८ महिन्यांची गरोदर होती. आणि १७ सप्टेंबर रोजी त्याचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला. मुलीचे पोट फाडतानाचा व्हिडिओ गौराबाई यांनी बुधवारी तक्रारीसोबत पोलिसांना दिला आहे. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी कायदेशीर सल्ला घेत असल्याचे सांगितले.
गौराबाईने सांगितले की, सासरच्या लोकांच्या माहितीवरून आम्हीही स्मशानभूमीत पोहोचलो. तेथे सासरच्यांनी मृतदेह चितेपासून वेगळा ठेवत सफाई कामगाराला बोलावले. आणि सफाई कामगाराने मुलीच्या पोटात छिद्र पाडले. सफाई कामगाराने एकामागून एक अनेक वेळा पोटात ब्लेड चालवून बाळाला काढण्याचा प्रयत्न केला. बाळाची नाळ बाहेर आली. यानंतर बाळाची नाळ कापून बाळाला बाहेर काढण्यात आले. आणि मग मृत बाळाचा मृतदेह पुरण्यात आला.
MP Crime Pregnant Women Death Relative Cruelty