इंडिया दर्पण ऑनलाई डेस्क
बीड जिल्ह्यात गुन्हेगारीने कळस गाठला असून जिल्ह्यातील गुन्हेगारी कमी व्हावी, अपहरणांच्या प्रकरणांची सीबीआय मार्फत चौकशी करावी, या मागणीसाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी घेतली.
या भेटीबाबत बजरंग सोनवणे यांनी सांगितले की, जिल्ह्यात बिघडलेल्या कायदा व सुव्यवस्थेबाबत शहा यांना निवेदन दिले. बीड जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेची स्थिती अत्यंत खराब झालेली आहे. कोणत्याही प्रकरणात अशासकीय लोकांचा हस्तक्षेप होत असल्याने पोलिस यंत्रणा हातचे बाहूले बनून काम करत आहेत. अर्थात पोलिस निपक्षपातीपणे काम करत नाहीत. परिणामी, जिल्हयात वाळूमाफिया, भूमाफिया, गुटखा माफिया, खंडणी, खून, अवैध शत्र्यांचा व्यापार फोफावत आहे. परळीत अमोल डुबे यांचे अपहरण करुन त्यांच्याकडून खंडणी वसूल करण्यात आली. मस्सोजोग येथील सरपंच पती संतोष देशमुख यांना पवनचक्की प्रकरणात खंडणीला विरोध केला म्हणून अपहरण करुन हत्या केली. असे सांगत त्यांनी गुन्हेगारी वाढत असल्याचे सांगितले. त्यामुळे ही भेट घेऊन निवेदन दिले.