अजय सोनवणे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
१५ वर्षांपासून मरळगोई- विंचूर रस्त्याला मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहे. या रस्त्याने मोठ्या प्रमाणात शेतकरी कांदा विक्रीसाठी विंचूर येथे घेऊन येतात, परंतु पंधरा वर्षापासून या रस्त्यावर मोठे-मोठे खड्डे पडल्याने नागरिकांना खड्ड्यांची समस्या सहन करावी लागत आहे. खड्डे पडल्यामुळे नागरिकांना पाठ दुखण्याचा त्रास, मणक्याचा त्रास ह्या समस्यांना सामोरे जावा लागत आहे. अपघाताचे प्रमाण सुद्धा खूप वाढले आहे. यानिमित्ताने आज येथील ग्रामस्थांच्या वतीने अनोखे आंदोलन करण्यात आले होते. या ठिकाणी मोठमोठ्या खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करण्यात आले मात्र आंदोलन होऊनही एक सुद्धा अधिकारी येथे उपस्थित न राहिल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त झाली. लवकरच या रस्त्याची दखल घेतली नाही तर लासलगाव विंचूर महामार्ग आडवण्यात येईल, असे ग्रामस्थांच्या वतीने सांगण्यात आले आहे. ग्रामस्थांच्या वतीने फोनवरून अधिकाऱ्यांसोबत चर्चा झाली असता काम करणार असल्याचे फक्त तोंडी आश्वासन देण्यात आली.