पुणे (इंडिया दर्पण वृतसेवा) – सध्या अनेक स्मार्टफोन कंपन्यांचे ऑनलाईन सेल सुरू आहेत. त्यातच ई-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्टवर Motorola Days सेल सुरू आहे. काल, दि.14 मे पासून सुरू झालेला हा सेल दि. 18 मे 2022 पर्यंत चालणार आहे. या 4-5 दिवसांच्या सेलमध्ये ग्राहक मोटोरोलाचे अनेक उत्तम स्मार्टफोन स्वस्तात खरेदी करू शकतात. विशेष म्हणजे या सवलतीसोबतच ग्राहकांना HDFC बँकेच्या कार्डवर कॅशबॅक देखील दिला जात आहे. Motorola फोनवरील 5 सर्वोत्तम डील जाणून घेऊ या…
मोटोरोला एज 20 फ्यूजन :
21,499 रुपयांचा हा फोन सेलमध्ये 18,999 रुपयांना विकला जात आहे. फोनमध्ये तुम्हाला 6 GB रॅम सह 128 GB स्टोरेज मिळत आहे. यात 6.67-इंचाचा फुलएचडी + डिस्प्ले, 5000 mAh बॅटरी, 108-मेगापिक्सेल प्राथमिक कॅमेरा आणि 32-मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा यांसारखी वैशिष्ट्ये आहेत.
Motorola G60 :
या सेल दरम्यान हा स्मार्टफोन 14,999 रुपयांना विकला जात आहे, तर त्याची वास्तविक किंमत 17,999 रुपये आहे. यामध्ये 128 GB स्टोरेज, 6.78 इंच फुलएचडी + डिस्प्ले, 6000 mAh बॅटरी, 108 मेगापिक्सल प्राइमरी कॅमेरा आणि 6 GB रॅमसह 32 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा मिळत आहे.
Motorola G22:
हा फोन फक्त 10,999 रुपयांना खरेदी करू शकता, तर वास्तविक किंमत 13,999 रुपये आहे. त्याचा बेस व्हेरिएंट 4 GB रॅम आणि 64 GB स्टोरेजसह येतो. यात 6.5 इंच HD+ डिस्प्ले, 5000 mAh बॅटरी, 50MP + 8MP + 2MP + 2MP रियर कॅमेरा आणि 16 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा यांसारखी वैशिष्ट्ये आहेत.
मोटोरोला e40 :
आता 10,999 रुपयांचा हा फोन सेलमध्ये 9,999 रुपयांना विकला जात आहे. फोनमध्ये 4 GB रॅम सह 64 GB स्टोरेज मिळत आहे. यात 6.5-इंचाचा HD+ डिस्प्ले, 5000 mAh बॅटरी, 48-मेगापिक्सेल प्राथमिक कॅमेरा आणि 8-मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा यांसारखी वैशिष्ट्ये आहेत.
Motorola edge 30 Pro :
एखाद्या ग्राहफाचे बजेट थोडे जास्त असेल आणि प्रीमियम फीचर्स हवे असतील तर हा फोन योग्य पर्याय असू शकतो. 55,999 रुपयांचा हा फोन 44,999 रुपयांना खरेदी करू शकता. म्हणजेच संपूर्ण 11 हजार रुपयांची सूट. यात 6.7-इंच फुलएचडी+ डिस्प्ले, 4800 mAh बॅटरी, 50MP + 50MP + 2MP रिअर कॅमेरा आणि 60MP फ्रंट कॅमेरा यांसारखी वैशिष्ट्ये आहेत.