नाशिक – जळगाव, धुळे,नंदुरबार, येथील प्रादेशिक, उपप्रादेशिक परिवहन कार्यालया अंतर्गत येणाऱ्या सीमा तपासणी नाक्यावर मोठ्या प्रमाणात अवैध वसुली व मालेगाव येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात बनावट कागदपत्रांचा सुळसुळाट. मोटर मालक कामगार वाहतुक संघटनेचे अध्यक्ष सचिन जाधव यांनी केले आहे. परिवहन विभाग हा भ्रष्टाचाराचा व बनावट कागदपत्रांचा अड्डा बनला आहे. हा सर्व प्रकार तातडीने थांबविण्यात यावा अन्यथा नाईलाजास्तव मोटर मालक कामगार वाहतूक संघटने तर्फे व्यापक आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही देण्यात आला आहे.
जाधव म्हणाले की, जळगाव परिवहन कार्यालय येथे बनावट आरसी तसेच प्रवासी व्यावसायिक वाहने हे अवैध रित्या प्रायव्हेट रजिस्टर केले जातात. प्रवासी व्यावसायिक वाहने १४ सीटर वाहने हे प्रायव्हेट रजिस्टर करता येत नाहीत म्हणून जळगाव परिवहन कार्यालय येथे येतात व प्रायव्हेट रजिस्टर केले जातात. त्यानंतर ही वाहने प्रायव्हेट रजिस्टर झाल्यानंतर परत दुसऱ्या ठिकाणी रजिस्टर केले जातात. म्हणजेच अनधिकृतरित्या काम करण्यासाठी व्यावसायिक प्रवासी वाहने जळगाव परिवहन कार्यालय येथे रजिस्टर करतात. तसेच जळगाव परिवहन कार्यालय येथील भरारी पथकाच्या मार्फत वाहन चालकांची आर्थिक लूट व मारझोड करण्यात येते असाच मार झोडीचा प्रकार हा एका ड्रायव्हर मुळे उघडकीस आला १५ नोव्हेंबर रोजी पहाटे साडे पाच वाजता नितिन सावंत व त्यांचे प्रायव्हेट सहकारी (गुंड) हे परिवहन विभागाच्या भरारी पथकाच्या वाहनातून जात असताना त्यांनी ट्रक चेकिंगचे नावाखाली थांबवली व चालकाला ट्रक चेक न करता तुझी गाडी ओव्हरलोड आहे असे सांगून त्याला बेदम मारहाण करण्यात आली होती व या मारहाणीत ट्रक ड्रायव्हर चोरे यांच्या पायाचे हाड मोडले हा सर्व प्रकारची जळगाव जिल्हा येथील रामानंद नगर पोलिस स्टेशन मध्ये तक्रार दाखल करण्यात आले होती तक्रार क्र.३२१/२०२१ ही आहे. अश्या मोटर वाहन निरीक्षक व प्रायव्हेट माणसे यांच्यावर कारवाई होत नसल्याने मोठे अधिकारी या लोकांची पाठ राखण करतात असे निदर्शनास येते.
धुळे प्रादेशिक परिवहन कार्यालय येथे रोड टॅक्स पुर्ण न घेता फिटनेस वाहनांना दिले जाते.
मालेगाव उपप्रादेशिक परिवहन कार्यालय येथे बनावट आरसी असताना सुद्धा गाडीची noc काढली जाते. जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्हा अंतर्गत येणाऱ्या सीमा तपासणी नाक्यावर नियुक्त असलेले मोटर वाहन निरीक्षक यांच्याकडून प्रायव्हेट माणसे नेमुन वाहन चालकांकडून अवैध वसुली ही मोठ्या प्रमाणात केली जाते. या सर्व प्रकरणाची वेळोवेळी तक्रार पत्रव्यवहारद्वारे ही संबधित अधिकारी यांना मोटर मालक कामगार वाहतुक संघटने तर्फे करण्यात आली आहेत. व परत एकदा परिवहन आयुक्त मुंबई, मुखमंत्री, केंद्रीय परिवहन मंत्री , परिवहन सचिव, पोलिस महासंचालक साहेब यांना करण्यात येत आहेत.