इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – अंनिसच्या आव्हानामुळे बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्णा शास्त्री चर्चेत आले आहेत. वाद निवळण्यापूर्वीच त्यांच्या आणि लोकप्रिय मोटिव्हेशनल स्पीकर आणि कथा वाचन करणाऱ्या जया किशोरी लग्नबेडीत अडकणार असल्याच्या वावड्या समाज माध्यमांवर उठत आहे. यामुळे दोघेही चर्चेत आले आहेत. धीरेंद्र शास्त्री यांनी ही निव्वळ अफवा ठरवीत चर्चेला पूर्णविराम दिला तर जया किशारी यांनी एका मुलाखतीत जोडीदाराबाबतच्या अपेक्षा व्यक्त केल्या आहेत.
एका वाहिनीला जया किशोरी यांनी मुलाखत दिली. त्यात लग्नासंदर्भातील अपेक्षा सांगितल्या. लग्नासाठी त्यांनी एक अटही ठेवली आहे. ही अट पूर्ण करणाऱ्या तरुणाच्या गळ्यात त्या वरमाला घालतील. ज्या तरुणाने ही अट पूर्ण केली, त्याच्यासोबत लग्न करण्याची इच्छा त्यांनी बोलून दाखवली. अट फारच क्लिष्ट वा कठिण नाही. त्यांचे आई-वडिलांवर खूप प्रेम आहे. त्यांना सोडून त्या राहू शकत नाही. त्यामुळे लग्नानंतर त्यांचे आई-वडिल जवळच्याच परिसरात रहावे, असे त्यांना वाटते. आई-वडिल कोलकातामध्ये राहतात यामुळे लग्नही कोलकतामध्येच झाले तर अतीउत्तम, असे त्या म्हणाल्या.
कोण आहेत जया किशोरी?
जया किशोरी या मुळच्या राजस्थानमधील सुजानगढ येथील आहेत. जुलै 1995 मध्ये त्यांचा जन्म झाला. त्यांचे मूळ नाव जया शर्मा आहे. लोक त्यांना किशोरी जी या नावाने ओळखतात. त्यांच्या वडिलांचे नाव शिव शंकर शर्मा आहे. त्यांच्या बहिणीचे नाव चेतना शर्मा आहे. जया किशोरी या कोट्याधीश आहेत. त्यांच्याकडे जवळपास 4 ते 5 कोटी रुपयांची संपत्ती आहे. कथेचे वाचन करणे आणि प्रेरणादायी विचार मांडणे हेच त्यांचे उत्पनाने साधन आहे.
जबरदस्त फॅन फॉलोअर्स
सोशल मीडियामध्ये जया किशोरी यांचे जबरदस्त फॅन फॉलोअर्स आहे. फेसबुकवर त्यांचे 8 दशलक्षाहून अधिक फॉलोअर्स आहेत. तर ट्विटरवर जवळपास 50 लाख फॉलोअर्स आहेत. अनेक लोक त्यांच्या प्रेरणादायी विचारांचे चाहते आहेत. त्यांच्या भाषणांनी अनेकांच्या दिवसांची सुरुवात होते.
https://twitter.com/iamjayakishorij/status/1617537320521191424?s=20&t=LrAWTpn0X_gQzFo_meoOhg
Motivational Speaker Jaya Kishori Wedding Rule