इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – बेंगळुरूमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आईनेच आपल्या मुलीला अपार्टमेंटच्या चौथ्या मजल्यावरून खाली फेकून दिल्याने मुलीचा मृत्यू झाला आहे. संपंगीरामनगर येथे गुरुवारी दुपारी ही घटना घडली आहे. महिलेने आपल्या मुलीला गळफास लावून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला मात्र शेजाऱ्यांनी तिला वाचवले. अपार्टमेंटमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ही घटना कैद झाली आहे.
पोलिस उपायुक्त (मध्य विभाग, बेंगळुरू) आर श्रीनिवास गौडा यांनी यासंदर्भात माहिती दिली. ते म्हणाले की,, “आम्ही माहिती मिळताच रुग्णालयात गेलो आणि तपासादरम्यान आम्हाला सांगण्यात आले की, मुलगी बाल्कनीतून पडली आहे. सविस्तर चौकशी केली असता कळले की काल रात्री उशिरा मरण पावलेल्या आपल्या मुलीला आईने मुद्दाम चौथ्या मजल्यावरुन फेकून दिले. याप्रकरणी आईविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तिला अटक करण्यात आली आहे. पुढील प्रक्रिया सुरू आहे.
मुलगी मानसिकदृष्ट्या विकलांग असल्याने आईने हे पाऊल उचलल्याचे प्रथमदर्शनी समोर आले असल्याचे त्यांनी सांगितले. पोलिसांनी सांगितले की आई दंतचिकित्सक आहे पण ती प्रॅक्टिस करत नव्हती आणि वडील सॉफ्टवेअर इंजिनियर आहेत. वडिलांच्या तक्रारीवरून या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
Mother Throws small daughter from fourth floor of building
Crime Bengaluru