इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – शाळांमध्ये मुलांमधील स्पर्धा सर्रास पाहायला मिळते आणि मुलांना चांगले गुण मिळावेत याकडे त्यांचे पालकही चिंतेत असतात. शिवाय अनेकदा या स्पर्धेमुळे अनेक पालक आपल्या पाल्याला प्रोत्साहन देतात, उद्युक्त करतात. जेणेकरुन पाल्य चांगला अभ्यास करेल. पण स्पर्धेचे एक भयानक प्रकरण पुद्दुचेरीमध्ये समोर आले आहे, जिथे एका विद्यार्थिनीच्या आईने मुलीच्या वर्गमित्राला विष देऊन ठार केले. हत्येचे कारण ऐकून पोलिसही चक्रावले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हत्या झालेला मुलगा हा इयत्ता आठवीत शिक्षण घेत होता. तो नेहमीच शैक्षणिक आणि अभ्यासेतर क्रियाकलापांमध्ये अव्वल असतो आणि तिची मुलगी मागे राहते. शुक्रवारी ही महिला मुलांच्या शाळेत पोहोचली. तिथे तिने चौकीदाराला सांगितले की, ती मणिकंदनची आई आहे. महिलेने शीतपेयांच्या दोन बाटल्या चौकीदाराला दिल्या आणि माझ्या मुलाला द्या, असे सांगितले. सांस्कृतिक कार्यक्रमाला उपस्थित राहिल्यानंतर चौकीदाराने त्या बाटल्या मणिकंदनला दिल्या.
हे पेय आईने पाठवले आहे असे समजून विद्यार्थ्याने ते पेय प्याले. मात्र घरी पोहोचल्यावर त्याला उलट्या होऊ लागल्या. यानंतर मुलाच्या पालकांनी त्याला रुग्णालयात नेले आणि उपचारानंतर त्याला घरी नेण्यात आले. मात्र शनिवारी तो पुन्हा आजारी पडला आणि रात्री त्याला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथेच त्याचा मृत्यू झाला. पण मृत्यूपूर्वी मणिकंदनने आईला सांगितले की, तिने चौकीदाराला दिलेले शीतपेय प्यायले. यावर आईला काहीतरी गडबड झाल्याचे जाणवले आणि त्यानंतर पोलिसांना या संपूर्ण प्रकरणाची माहिती देण्यात आली.
एसएसपी लोकेश्वर म्हणाले की, पोलिसांनी तत्काळ तपास सुरू केला. त्यात स्पष्ट झाले की ते पेय सग्याराणीने दिले. पोलिसांनी ताबडतोब तिला अटक केली आहे. तपासादरम्यान पोलिसांनी सांगितले की, महिलेने शीतपेयात काहीतरी मिसळले होते, त्यामुळे विद्यार्थ्याला खुप जुलाब झाले आणि सतत उलट्या होऊ लागल्या. महिलेने या पेयात विष मिसळले होते. चौकशीत तिने गुन्हा कबूल केला आहे. दरम्यान, ही बाब उघडकीस आल्यानंतर सर्वांना आश्चर्य वाटत आहे की, केवळ शालेय स्पर्धेमुळे एक महिला एखाद्या चिमुकल्याचा थेट जीव कसा घेऊ शकते?
Mother Murder Girls Classmate Due to This Reason
Crime Puducherry Police School Student Poison