अजय सोनवणे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
नांदगांव – तालुक्यातील ढेकु येथे जन्मदात्या आईने पंधरा हजाराची सुपारी देऊन मुलाची हत्या केल्याची घटना उघडीस आली आहे. जनार्दन अप्पा पेंढारे (४७) हे मृत मुलाचे नाव आहे. जनार्दन याच्या डोक्यावर लोखंडी पहारीने जबरदस्त वार करुन जखमी करुन जीवे ठार मारण्यात आले. त्यानंतर त्याचे प्रेत निऴया रंगाच्या प्लास्टिक गोणी मध्ये भरुन साईनाथ झब्बु राठोड यांच्या शेतातील विहिरीत फेकून दिले. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर आरोपीला गजाआड करण्यात आले आहे.
गुरुवारी दुपारच्या सुमारास आई जनाबाई अप्पा पेंढारे हिने आपला मुलगा जनार्दन वेड़सर असल्याने पळाशी येथील समाधान दौलत भड (३७) याला रुपये पंधरा हजाराची सुपारी दिली. त्यानंतर जन्याबाई अप्पा पेंढारे यांच्या राहत्या घरामध्ये ही हत्या करण्यात आली. ही घटना समजल्यानंतर घटनास्थळी मनमाडचे उपविभागीय पोलिस अधिकारी समिरसिंग साऴवे, पोलिस निरीक्षक रामेश्वर गाड़े, उपपोलिस निरीक्षक वाघ मोरे हे उपस्थित होते.