नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कोणतीही माता आपल्या लहान मुलांची अतिशय काळजी घेते, परंतु काही वेळा शिस्तीच्या नावाखाली किंवा शिक्षा करायचा नादात पालक मुलांना सोबत जीवघेणा प्रकार करतात, असे काही ठिकाणी आढळून आले आहे. दिल्लीमध्ये देखील असाच प्रकार घडला, किरकोळ कारणावरून सख्या आईने आपल्या लहान बाळाचा सोबत जीवघेणा प्रकार केल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे.
दिल्ली शहरातही धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका आईने आपल्या पाच वर्षांच्या मुलीचे हात-पाय बांधून तिला भर उन्हात टेरेसवर सोडले. कडक उन्हात ती ओरडतच राहिली. या असाह्य मुलीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. यानंतर दिल्ली महिला आयोगाने त्याची दखल घेत पोलिसांकडे कारवाई करण्याची मागणी केली आहे.
दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनी सांगितले की, राजधानीच्या तुकमीरपूरच्या खजुरी खास भागात एका मुलीला कडक उन्हात टेरेसवर बांधून ठेवले होते. निष्पाप बालिकेचे हात-पाय बांधलेले असून, व्हिडीओमध्ये ते स्पष्ट दिसत आहे. मुलगी ओरडताना आणि रडताना दिसली. तसेच मालीवाल म्हणाल्या, ‘मुलीची सुटका करण्यात आली आहे. यासोबतच दिल्ली पोलिसांना नोटीस देऊन या प्रकरणी एफआयआरची मागणी करण्यात आली आहे. यानंतर पोलिसांनी बाल न्याय कायद्यानुसार एफआयआर नोंदवला आहे. याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.
कुणीतरी मुलीचा व्हिडिओ बनवला. जो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. व्हिडिओ खूपच थक्क करणारा आहे. त्यामध्ये निष्पाप बेड्यांमध्ये अडकल्याचे दिसत आहे. मुलीला तालिबानकडून शिक्षा होत असल्याचे दिसते. मुलगी हातपाय बांधून उन्हात चकरा मारत आहे. कडक उन्हात छत खूप तापले होते, त्यामुळे ती मुलगी वेदनेने ओरडत होती . सोशल मीडियावर युजर्स आईवर कारवाई करून कडक शिक्षा करण्याची मागणी करत आहेत.