इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – लहान मुले ही निरागस असतात असे म्हटले जाते, तसेच भावबहिणींमध्ये खूप प्रेमाचे नाते असते जिव्हाळा असतो असे दिसून येते लहान भाऊ बहिण भाऊ असल्यास ते भांडतात. परंतु लगेच गोडही बोलतात, त्यांचा राग क्षणिक असतो असे दिसून येते, मात्र अलीकडच्या काळात नात्यांमध्ये स्पर्धा निर्माण होऊन दुरावा निर्माण झाल्याची दिसून येत आहे.
भाऊ बहिणींमध्ये ईर्षा आणि द्वेषही वाढत असल्याच्या घटना समोर येत आहेत. हरियाणामध्ये देखील अशीच घटना घडली. रागाच्या भरात एका लहान मुलीने आपल्या लहान भावाचा किरकोळ कारणावरून जीव घेतला. आपल्याला वडिलांचे प्रेम मिळत नाही तसेच भावाने हातात मोबाईल दिला नाही या रागातून तिने एक कृत्य केल्यास म्हटले जाते. ही घटना सर्वच पालकांच्या जीवाला घोर लावणारी आहे.
मुलीने दिली गुन्ह्याची कबुली
हरियाणातील फरिदाबादमध्ये ही धक्कादायक घडली आहे . उत्तर प्रदेशातील औरैया येथील एक दाम्पत्य फरीदाबादमध्ये आपल्या मुलांसह राहते. दोघेही वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये काम करतात. त्यांचा १२ वर्षांचा मुलगा पाचवीत शिकतो आणि १५ वर्षांची मुलगी दहावीत शिकते. मात्र एके दिवशी ते दोघेही कामावरून घरी परतले तेव्हा त्यांचा मुलगा बेशुद्धावस्थेत आढळला. त्यांनी तातडीने त्याला रुग्णालयात नेले. परंतु डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले.
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून त्यांनी अज्ञातांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला. मात्र तपासादरम्यान मुलाची हत्या झाल्याचा संशय पोलिसांला आला. पुढील तपास पोलिसांनी याच दृष्टीकोनातून सुरू केला. तपासादरम्यान पोलिसांना मुलीवर संशय आला. यानंतर पोलिसांनी तिची कडक चौकशी केली असता अखेर तिने गुन्ह्याची कबुली दिली.
पोलिसांनाही बसला धक्का..
लहान मुलाची हत्या झाल्याच्या घटनेची पोलिसांनी चौकशी केली, तेव्हा मुलीने सांगितले की, आपल्या भावाला आई वडिलांकडून अधिक प्रेम आणि आपुलकी मिळते असे वाटल्याने तिने त्याची हत्या केली. तसेच मोबाईल गेम खेळण्यासाठी भावाकडे मोबाईल मागितला आणि त्याने तो देण्यास नकार दिला त्यामुळेही तिला राग आला होता. या मुलीने सांगितले की, तिने भावाकडे फोन मागितला तेव्हा त्याने दिला नाही. यानंतर रागाच्या भरात तिने लहान भावाचा गळा आवळून खून केला.
सध्या अल्पवयीन मुलीची चौकशी सुरू आहे. कायदेशीर प्रक्रियेनंतर अल्पवयीन मुलीला बाल न्याय मंडळासमोर हजर करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र अशा प्रकारचे आई-वडील दोघेही नोकरीला असताना घरात दोन लहान मुले नेमके काय करतात याची पालकांनी काळजी घेणे तसेच दोन्ही मुलांना सारखाच प्रेम देणे त्यांच्या गरजा पुरविणे आवश्यक आहे, अन्यथा अशा प्रकारच्या वाईट घटना घडू शकतात हेच या प्रकरणातून दिसून येते.
Mother Father Love Small Brother Sister Crime