इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – मातेचे निधन झाल्यास तिच्यावर अंत्यसंस्कार करण्याची जबाबदारी मुलाची असते. परंतु बिहारमध्ये एका वृद्ध महिलेचे निधन झाल्यावर तिच्या मुलांमध्ये अंत्यसंस्कार कसे करावेत, यावरून दोन मुलांमध्ये वाद झाला. याला कारण म्हणजे तिचा एक मुलगा मुस्लिम, तर दुसरा हिंदू आहे. अखेर वाद मिटला, मात्र या प्रकरणाची सर्वत्र चर्चा सुरू आहे.
बिहारच्या लखीसराय जिल्ह्यातील जानकीडीह गावात एका महिलेचा मृत्यू झाला. महिलेच्या अंतिम संस्काराबाबत वाद निर्माण झाला होता. त्या स्त्रीच्या पोटी जन्मलेले दोन पुत्र समोरासमोर आले. एका मुलाचे नाव मोहम्मद मोफिल, दुसऱ्याचे नाव बबलू झा आहे. सदर महिलेचा मुस्लिम मुलगा मोफिल याला त्याच्या ‘अम्मी’वर मुस्लिम रितीरिवाजांनुसार अंत्यसंस्कार करायचे होते, तर महिलेचा हिंदू मुलगा बबलू याने त्याच्या ‘आई’वर हिंदू रितीरिवाजांनुसार अंत्यसंस्कार करणार होता.
या घटनेबाबत अधिक माहिती अशी की, या एक महिलेचे दोन नावे आहेत, एक रायका खातून आणि दुसरे रेखा देवी. मोफिलची ‘आई’ही तीच आणि बबलूची ‘आई’ही तीच होती, त्यामुळे महिलेच्या अंत्यसंस्कारावरून वाद वाढला. वाद वाढत असल्याचे पाहून स्थानिकांनी चाणण पोलिसांना माहिती दिली. सुमारे ४५ वर्षापूर्वी रायका खातून यांचा विवाह एका मुस्लिमाशी झाला होता. यामुळे रायकाला दोन मुले झाली. एक मोहम्मद मोफिल, दुसरा मोहम्मद सोनेलाल. नंतरच्या वर्षांत, रायकाला तिच्या पतीने सोडून दिले. त्यावेळी रायकाची दोन्ही मुले मोफिल आणि सोनेलाल यांचे वय दोन-तीन वर्षे असावे. दरम्यान, राजेंद्र झा यांचा विवाह रायका खातून यांच्याशी झाला. राजेंद्र झा यांनी रायकाचे नाव रेखा देवी असे ठेवले होते.
मात्र पत्नी मुस्लीम असूनही राजेंद्र झा यांनी रायका खातून यांच्यावर आपला हिंदू धर्म लादला नाही. राजेंद्र झा स्वतः हिंदू पुजारी म्हणून पुजा करत राहिले आणि त्यांची पत्नी रायका नमाज अदा करत राहिली. राजेंद्र झा यांनी रायकाला मुस्लिम धर्म पाळण्याचे पूर्ण स्वातंत्र्य दिले. राजेंद्रला हवे असते तर तो रायका आणि तिच्या दोन मुलांचा धर्म बदलू शकला असता, पण त्याने तसे केले नाही. रायका यांनी राजेंद्र झा यांच्या धर्माचाही आदर केला.
रायकाचे दोन मुस्लीम मुलगे मोफिल आणि तिच्या पहिल्या पतीपासून सोनेलाल आणि राजेंद्र झा यांची दोन मुले, मुलगा बबलू आणि मुलगी टेट्री म्हणजेच चारही मुले एकाच छताखाली वाढली. मात्र आता सदर महिलेचा जेव्हा मृत्यू झाला, तेव्हा तिच्या अंत्यसंस्कारावरुन मुलांमध्ये वाद सुरू झाला. मोठ्या मुलाला आईचा अंतिम संस्कार मुस्लिम रितीनुसार करायचा होता, तर लहान मुलाला हिंदू रितीनुसार करायचा होता. दोन्ही मुलांमध्ये अंत्यसंस्कार करण्यावरून वाद झाला पोलीसांनी दोन्ही मुलांना समजावून सांगून वाद मिटवला. त्यानंतर महिलेचा मृतदेह तिचा लहान मुलगा बबलू झा याच्या ताब्यात देण्यात आला. त्याला त्याच्या आईचे अंतिम संस्कार करण्यास परवानगी दिली. त्यानंतर आता विधी करायचे असतील तर ते मुस्लिम रितीरिवाजा नुसार करावेत, असे मोफिल यांना सांगण्यात आले. तर बबलू झा यांना हिंदू रितीरिवाजांनुसार विधी करण्यास सांगण्यात आले. रात्री उशिरा बबलू झा याने आईला अग्नी दिला. यावेळी गावातील नागरिकांची मोठी गर्दी झाली होती.
Mother Death Son Muslim and Hindu Cremation Issue
Bihar Controversy