इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – – नव्वदच्या दशकात महेश भट यांचा ‘जख्म’ हा सिनेमा खूप गाजला होता. या सिनेमाने राष्ट्रीय पुरस्कारही पटकावला होता. या चित्रपटातील आई जी मुळात मुस्लीम असते पण हिंदू मुलासोबत लग्न करते. तिच्या अंत्यसंस्काराच्या वेळी दोन्ही मुलं भांडतात. एकाचे म्हणणे असते मुस्लीम धर्मानुसार अंत्यविधी व्हावा आणि दुसऱ्याचे म्हणणे असते मुस्लीम धर्मानुसार व्हावा. अश्याचप्रकारची एक घटना हैदराबाद येथे घडली.
एका महिलेने ९४ व्या वर्षी निधन झाले. तिला दोन मुलं आहेत. एक मुलगा व एक मुलगी. हे खरे तर हिंदू कुटुंब आहे. पण मुलीने २० वर्षांपूर्वी मुस्लीम धर्म स्वीकारला. त्यामुळे आई गेल्यानंतर हिंदू पद्धतीने अंत्यविधी करण्याची तयारी मुलाने सुरू केली. पण मुलीने मुस्लीम पद्धतीने अंत्यविधी व्हावा, यासाठी हट्ट धरला. दोघेही या मुद्यावरून भांडायला लागले. शेजारीपाजारी, नातेवाईक त्यांना समजावू लागले, पण दोघेही ऐकायला तयार नव्हते.
आपल्या जिद्दीवर अडून बसले होते. हैरदाबाद येथील मदन्नापेटमध्ये दराबजंग कॉलनीमध्ये सुरू असलेला हा वाद बघता बघता संपूर्ण शहरात पोहोचला. काही क्षणात त्यावर सोशल मिडियावर चर्चा सुरू झाल्या. आई हिंदू असल्याने तिच्यावर हिंदू पद्धतीने अंत्यसंस्कार व्हावे, ही मुलाची अपेक्षा बरोबर होती, असे सगळ्यांचे म्हणणे होते. बहुतांश लोक मुलाच्या बाजुने होते.
मी आईचा सांभाळ केला
गेल्या बारा वर्षांपासून ज्या आईकडे मुलाने लक्षही दिले नाही, त्या आईचा सांभाळ मुलगी करत होती. मुलीने मुस्लीम धर्म स्वीकारला असला तरीही शेवटी तिची आई होती. त्यामुळे गेली बारा वर्षे ती आईचा चांगल्याप्रकारे सांभाळ करत होती. यादरम्यान आईने मुस्लीम धर्म स्वीकारला होता त्यामुळे तिच्यावर मुस्लीम पद्धतीने अंत्यसंस्कार व्हावे, अशी मुलीची अपेक्षा होती.
दोन्ही पद्धतीने अंत्यसंस्कार
हा वाद इतका विकोपाला गेला की पोलिसांना मध्यस्थी करावी लागली. पोलिसांनी दोघांनाही समजावले. त्यानंतर मुलीला आईचा मृतदेह सोपविण्यात आला. तिथे मुस्लीम पद्धतीनुसार प्रार्थना करण्यात आली. त्यानंतर मृतदेह मुलाच्या ताब्यात आला आणि हिंदू पद्धतीने अंत्यसंस्कार करण्यात आले.
Mother Cremation Hindu Muslim Controversy