वॉशिंग्टन – ‘ साला एक मच्छर आदमी को… ‘ असा अभिनेता नाना पाटेकर यांचा प्रसिद्ध डायलॉग आहे, मच्छर किंवा डास हा अत्यंत छोटा आणि क्षुल्लक असलेला किटक असला तरीही सर्वांना तो उपद्रवी वाटतो, कारण डासांमुळे मलेरिया होऊ शकतो. त्यामुळे सर्वच लोक त्याला घाबरतात. मात्र आता डासच मलेरियाचा अटकाव करणार असल्याचे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे.
डास चावल्यामुळे मलेरिया होत असल्याने त्याला टाळण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जातात, परंतु आता परिस्थिती बदलणार आहे. वैज्ञानिक अभ्यासक डासांमुळे होणाऱ्या डासांच्या आतड्यात असे काही बदल करण्याचा प्रयत्न करीत आहेत जेणेकरून ते आपल्या पुढच्या पिढीमध्ये मलेरियाविरोधी जनुक पसरवू शकेल. यामुळे मलेरियाचा प्रादुर्भाव नियंत्रित करण्यात मदत होईल. ई-लाइफ नावाच्या जर्नलमध्ये यासंदर्भातील प्राथमिक अभ्यास प्रकाशित करण्यात आला आहे.
जीन एडिटिंग तंत्र :
नवीन अभ्यासात मलेरिया पसरण्याची डासांची क्षमता कमी करण्यासाठी जनुकीय संपादन तंत्राद्वारे त्याचे जीन सुधारित केले गेले. त्यामुळे मलेरिया रोग आणि त्यातून होणारे मृत्यू कमी करण्यात महत्त्वपूर्ण यश मिळवू शकेल. डासांवर जंतुनाशकांचा प्रभाव होत नाही. कारण त्यांची प्रतिकार शक्ती वाढली आहे तसेच मलेरियाविरोधी औषधांचा प्रभाव देखील कमी झाला आहे, त्यामुळे डासांचा सामना करण्यासाठी नवीन मार्ग शोधण्याची तातडीची गरज बनली आहे.
मलेरियापासून बचाव करण्याचे मार्ग :
मलेरियापासून बचाव करण्याचे दोन मार्ग असू शकतात – प्रथम, सुधारित जीन असलेल्या डासांची संख्या कमी करण्यासाठी वातावरणात सोडले जाते आणि दुसरा मार्ग म्हणजे मलेरिया पसरवण्यासाठी डासांची शक्ती कमी करणे. परंतु असे करण्यापूर्वी शास्त्रज्ञांना खात्री करुन घ्यावी लागेल की, ही एक सुरक्षित आणि प्रभावी पद्धत आहे काय.
जीन ड्राइव्ह एक प्रभावी समाधान :
लंडनमधील इम्पीरियल कॉलेजचे संशोधक आणि अभ्यासाचे पहिले लेखक एस्ट्रिड होर्मन म्हणतात की मलेरियावर नियंत्रण ठेवण्यासाठी जीन ड्राईव्ह एक प्रभावी शस्त्र असल्याचे सिद्ध होऊ शकते. परंतु ज्या देशांमध्ये मलेरियाचा प्रादुर्भाव जास्त आहे तेथे त्याच्या चाचणीचा वापर सुरक्षितपणे करावा लागणार आहे.
मलेरिया नियंत्रण सोपे होईल:
हरमन आणि त्याच्या सहकाऱ्यांनी केलेल्या अभ्यासानुसार, मलेरियामुळे उद्भवणार्या डासांच्या जनुकमध्ये बदल केले. त्यांनी सीआरआयएसपीआर-सीएएस 9 तंत्राद्वारे मलेरियाविरोधी प्रथिने तयार करू शकणारे एक जीन सादर केले. हे प्रथिन डासांच्या चाव्याव्दारे शरीरात प्रवेश करते. तसेच संपूर्ण डीएनए एक जनुक ड्राइव्ह म्हणून कार्य करते आणि इतर डासांपर्यंत पोचवले जाऊ शकते. तसेच डास पुढील पिढीला जन्म देऊन सुधारित जीन्ससह डास निरोगी राहू शकतील काय, हे पाहण्यासाठी प्रयोग केला. डासांच्या पोटात मलेरिया परजीवी कशी वाढतात याचीही त्यांनी तपासणी केली. त्यामुळे मलेरिया नियंत्रण सोपे होईल, असा प्राथमिक पुरावा संशोधकांच्या प्रयोगांनी दिला आहे.