मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पहाटेच्या शपथविधीची माहिती शरद पवारांप्रमाणेच संजय राऊतांना देखील होती, असा खळबळजनक गौप्यस्फोट शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी केला आहे. त्यावेळी राऊत पडद्यामागून हालचाली करीत होते, असा मोठा दावाही त्यांनी केला आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःच पहाटेच्या शपथविधीमागील घडामोडींवरून पडदा उठविला. शरद पवारांसोबत चर्चेनंतरच पहाटेचा शपथ विधी झाल्याचे त्यांनी सांगितले होते. यामुळे गेली काही दिवस पहाटेच्या शपथविधीचे गुऱ्हाळ पुन्हा उठले आहे. यातच आता शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. पहाटेच्या शपथविधीची माहिती शरद पवारांप्रमाणे संजय राऊतांना देखील होती असे वक्तव्य शिरसाट यांनी केले आहे.
सर्व घडवून आणण्यामागे त्यांचा हात
वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत संजय शिरसाट म्हणाले की, पहाटेच्या शपथविधीबाबत संजय राऊत यांना देखील माहिती होती. संजय राऊत पडद्यामागून काम करत होते. त्यांना हे प्रकरण माहित होते. त्यामुळे पहाटेचा शपथविधी घडवून आणण्यामागे संजय राऊत यांचा मोठा वाटा असल्याचा दावा संजय शिरसाट यांनी केला आहे. शिरसाट यांच्या गौप्यस्फोटाने राजकीय वातावरण आणखीनच तापण्याची शक्यता आहे. तुर्त शिरसाट यांच्या वक्तव्यावरील ठाकरे गटाच्या प्रतिक्रेयेची प्रतीक्षा आहे
राऊत सायको असल्याचा आरोप
संजय राऊत सायको आहेत, ते कधी काय बोलतील आणि कोणाला अडचणीत आणतील हे सांगताच येत नाही. उद्धव ठाकरे यांची जी अडचण वाढली आहे, ती फक्त या सायको भुमिकेने झाली आहे. संजय राऊत वक्तव्य करतात आणि ते निस्ताराचे काम उद्धव ठाकरे यांना करावे लागत होते. हे सर्व उद्धव ठाकरे यांना देखील माहित आहे. तर सायकोपणा करणे आणि जे घडलं नाही त्यावर भाष्य करणे यात राऊत यांना आनंद मिळत असल्याचे देखील संजय शिरसाट म्हणाले.
Morning Oath Ceremony Shivsena Sanjay Raut