इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
राज्यातील शाळांमध्ये पहिलीपासून हिंदी सक्तीविरोधात ५ जुलै रोजी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या मोर्चात राज ठाकरे आणि उध्दव ठाकरे हे एकत्र येणार आहेत. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शुक्रवारी ही घोषणा केली. त्यांनी सोशल मीडियावर दोघांचा एकत्र फोटो टाकत त्यात म्हटले आहे की, महाराष्ट्रतील शाळांत हिंदी सक्ती विरोधात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल!
या पोस्टनंतर त्यांनी एक इंग्रजीतही पोस्ट केली. त्यात त्यांनी “There will be a single and united march against compulsory Hindi in Maharashtra schools. Thackeray is the brand!” असे म्हटले आहे. या सोशल मीडियात करण्यात आलेल्या पो्स्टनंतर राऊत यांनी आज पत्रकार परिषद घेत त्याबद्दली माहिती दिली. त्यांनी काल झालेल्या चर्चेबाबत पत्रकारांना सांगितले.