इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – गुजरातच्या मोरबी येथे कोसळलेल्या पुलाची दुर्घटना जगभरातच चर्चेचा विषय बनली आहे. या भयंकर दुर्घटनेत १३४ जणांचा बळी गेला आहे. ही दुर्घटना का आणि कशी झाली याबाबत सर्वत्र चर्चा होत आहे. त्यातच आता एक व्हिडिओ समोर आला आहे. त्यातून हा पूल कसा कोसळला हे दिसून येत आहे. अवघ्या काही सेकंदातच पूल कोसळला आणि या पुलावर असलेले शेकडो जण नदीत कोसळले.
बघा हा व्हायरल व्हिडिओ
मोरबी पुल हादसे का वीडियो आया सामने. #Morbi pic.twitter.com/A3tkXYhvLQ
— The Lallantop (@TheLallantop) October 31, 2022
रशियन अध्यक्षांनी व्यक्त केला शोक
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी गुजरातमधील मोरबी शहरातील पूल दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांप्रती शोक व्यक्त केला आहे. या अपघातात आतापर्यंत १३४ जणांचा मृत्यू झाला आहे. सोमवारी क्रेमलिन वेबसाइटवर प्रकाशित राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलेल्या संदेशात पुतिन म्हणाले की, “माननीय राष्ट्रपती, माननीय पंतप्रधान, कृपया गुजरात राज्यातील दुःखद पूल दुर्घटनेबद्दल माझ्या शोकांचा स्वीकार करा.”
रशियन न्यूज एजन्सी TASS ने दिलेल्या माहितीनुसार, पुतिन यांनी या दुर्घटनेत प्राण गमावलेल्या लोकांच्या प्रियजन आणि मित्रांप्रती सहानुभूती आणि समर्थन व्यक्त केले. तसेच सर्व जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशा शुभेच्छाही त्यांनी दिल्या. त्याचवेळी रशियाचे राजदूत डेनिस अलीपोव्ह यांनीही या घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. ते म्हणाले की, ‘काल मोरबीत भयंकर दुर्घटना घडली! मरण पावलेल्यांच्या कुटुंबियांना, पंतप्रधान मोदी आणि संपूर्ण भारत आणि गुजरातच्या लोकांप्रती हार्दिक संवेदना! जखमींना लवकरात लवकर बरे व्हावे अशी माझी इच्छा आहे!’
नेपाळच्या पंतप्रधानांनी शोक व्यक्त केला
नेपाळचे पंतप्रधान शेर बहादूर देउबा यांनीही मोरबी येथील पूल दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. पीएम देउबा म्हणाले की, ‘गुजरातमधील मोरबी येथे झालेल्या पूल दुर्घटनेने मला खूप दु:ख झाले आहे. या अपघातात मौल्यवान जीवितहानी झाल्याबद्दल आम्ही भारत सरकार आणि भारतातील लोकांप्रती हार्दिक शोक व्यक्त करतो. आमच्या संवेदना आणि प्रार्थना शोकग्रस्त कुटुंबांसोबत आहेत.
Morbi Video Viral How Accident Happen
Gujrat Bridge Collapse