इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – गुजरातच्या मोरबी येथील पूल दुर्घटनेने संपूर्ण देशभरात हळहळ व्यक्त होत आहे. तसेच, ही दुर्घटना का घडली याविषयीही तर्कवितर्क लढविले जात आहेत. आणि आता या दुर्घटनेचे खरे कारणही समोर आले आहे, पूल का कोसळला, कोण कारणीभूत आहेत याची माहिती उघड होत आहे. मच्छू नदीवरील केबल पूल काल सायंकाळी सुमारास कोसळल्याने या अपघातात १३२ जणांचा मृत्यू झाला आहे.
घटनेतील प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, जेव्हा ते आणि त्यांचे कुटुंब पुलावर होते तेव्हा काही तरुण मुद्दाम पूल हलवत होते, त्यामुळे लोकांना पुलावरून चालणे कठीण होत होते. हा धोका असू शकतो हे ओळखून आम्ही पुलावरून खाली आलो. याबाबत आम्ही पुलाच्या कर्मचाऱ्यांनाही माहिती दिली, मात्र त्यांनी दुर्लक्ष केल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. ब्रिटीशांच्या काळात बांधण्यात आलेला हा पूल दुरुस्तीच्या चार दिवस आधी जनतेसाठी खुला करण्यात आला होता.
‘काही तरुण जाणीवपूर्वक पूल हलवत होते’
प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, दिवाळीच्या सुटीत आम्ही कुटुंबासह मोरबीला आलो होतो. ‘पुलावर खूप गर्दी होती. मी आणि माझे कुटुंबीय तिथे पोहोचलो तेव्हा काही तरुण मुद्दामहून पूल हलवत होते. लोकांना आधाराशिवाय त्यावर उभे राहणे कठीण होते. हे धोकादायक ठरू शकते असे वाटल्याने मी पुलावरून काही अंतर चढूनच कुटुंबासह खाली आलो. तेथून निघण्यापूर्वी मी ड्युटीवर असलेल्या कर्मचाऱ्यांनाही लोकांना पुलावरून जाण्यापासून रोखण्यास सांगितले. पण, त्यांना फक्त तिकीट विकण्यातच रस होता आणि गर्दीवर नियंत्रण ठेवण्याचा कोणताही मार्ग नाही. तेथून निघाल्यानंतर काही तासांतच आमची भीती खरी ठरली आणि पूल कोसळला.
तो व्हिडिओ व्हायरल
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये काही तरुण पुलाच्या केबलला लाथ मारताना आणि इतरांना घाबरवण्यासाठी पूल हलवताना दिसत आहेत. घटनास्थळी उपस्थित असलेल्या अनेक मुलांनी सांगितले की, पूल कोसळल्यानंतर त्यांचे कुटुंबीय किंवा पालक अद्याप बेपत्ता आहेत. १० वर्षांचा मुलगा म्हणाला, ‘पुल अचानक तुटला तेव्हा खूप गर्दी होती. मी वाचलो कारण मी दोरी पकडली आणि नंतर हळू हळू त्यावर आलो. पण माझे पालक अजूनही बेपत्ता आहेत.
https://twitter.com/MrsGandhi/status/1586765673081937921?s=20&t=PqdKtoWMWX3ww9sqFyy-XA
या दुर्घटनेतून बचावलेल्या एका व्यक्तीने सांगितले की, जेव्हा पूल तुटला तेव्हा सुमारे ३०० लोक त्यावर उभे होते. आम्ही पुलावर होतो तेव्हा अचानक मधूनच दाबायला सुरुवात केली. सगळे खाली पडले. अनेकांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले. पुलावर खूप लोक होते, त्यामुळे तो कोसळला.
एका स्थानिक रहिवाशाने सांगितले की, “काही दिवसांपूर्वी लोकांसाठी पुन्हा खुला करण्यात आला. काल पुलावर सुमारे ३०० लोक असावेत. मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये सर्वाधिक मुले आहेत, कारण ते सर्व जण दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये आले होते. स्थानिक लोकांनी तात्काळ घटनास्थळ गाठून जास्तीत जास्त लोकांना वाचवले. अपघातानंतर मोरबीच्या सर्व भागातून मोठ्या संख्येने लोक मदत आणि बचावासाठी घटनास्थळी पोहोचले.
Morbi Bridge Collapse Accident Cause Video Viral
Gujrat