इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – गुंतवणुक करणे ही सवय नसून एक वृत्ती आहे, असे म्हटले जाते. म्हणजे लाख वेळा सांगूनही एखाद्याला गुंतवणुकीची सवय लागत नाही आणि एखाद्याला काहीही न सांगता तो योग्य वयात गुंतवणुक सुरू करतो. भविष्य आर्थिक तणावात घालवायचे नसेल तर वर्तमानात गुंतवणुक करावी, असा सल्ला तज्ज्ञ देतात. गुंतवणुकीचे अनेक पर्याय असले तरीही एक असा मार्ग आहे, जो तुम्हाला निवृत्तीच्या वयापर्यंत शंभर टक्के योग्य परतावा देतो.
एसआयपी (SIP) म्हणजेच सिस्टीमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लान हा दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी सर्वोत्तम मार्ग असल्याचे म्हटले जाते. म्हणजे वयाच्या २५ व्या वर्षीपासून दरमहा विशिष्ट्य पैसे गुंतवले तर निवृत्तीच्या वयापर्यंत खात्रीलायक मोठे रिटर्न्स मिळतात. त्यासाठी या वयात योग्य दिशा ठरविणे महत्त्वाचे आहे. त्यानंतर भविष्यातील एक ध्येय निश्चित करणे महत्त्वाचे आहे. तसे केले तर एसआयपी तुम्हाला लखपती बनविल्याशिवाय राहणार नाही, असे तज्ज्ञ सांगतात. दीर्घ मुदतीत मल्टिपल परतावा देणारी ही स्कीम आहे.
बरेचदा वयाच्या तिशीनंतर लोक गुंतवणुक सुरू करतात. म्हणजे सुरुवातीची पाच वर्षे गुंतवणुकीचे महत्त्वच अनेकांना कळत नाही. कारण या काळात नुकताच पैसा हाती यायला सुरुवात झाली असते. त्यामुळे त्याचे महत्त्व समजत नाही. त्या पैश्यांतून गुंतवणुक करण्याचा सल्ला देणारे लोकही कमी असतात. आणि सल्ला दिलाच तर तो एखादे भाषण समजून सोडून दिला जातो. पण त्याच कारणाने भविष्यात आर्थिक स्थैर्य लाभत नाही. अश्यावेळी दरमहा एक हजार रुपये एसआयपी भरण्याची शिस्त लावली तर भविष्यातील आर्थिक समस्या दूर होऊ शकतात. आणि एका मध्यमवर्गीय माणसासाठी भविष्यातील गुंतवणुक म्हणून दरमहा एक हजार रुपये अतिशय सामान्य रक्कम आहे.
नेट रिटर्न ५० लाख रुपये
एसआयपीतून नेट रिटर्न ५० लाख रुपये मिळतात, असे ऐकल्यावर कुणालाही आश्चर्यच वाटेल. पण हे सत्य आहे. वयाच्या २५ व्या वर्षीपासून दरमहा १ हजार रुपये जमा केल्यास ११ टक्के परताव्यानुसार साठाव्या वर्षी ५०.७३ लाख मिळतील. ३५ वर्षांत जमा रक्कम ४.२ लाख आणि परतावा ४५.५३ लाख रुपये होतो. तर नेट रिटर्न ५० लाख रुपये होतो. यात पाच वर्षांनी जरी गुंतवणुकीला उशीर केला तर या रकमेत १२ लाखांची घट होण्याची शक्यता असते.
Monthly 1 Thousand Investment 50 Lakh Return Scheme