इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – पावसाळ्यामध्ये आहार नक्की कसा असावा याबाबत आयुर्वेदामध्ये विस्तृतपणे सांगितले आहे. पावसाळ्यातील वातावरणाचा परिणाम मानवी शरीरावर होतो. खासकरुन सर्दी, पडसे, अंगदुखी, ताप, खोकला याचे प्रमाण अधिक असते. अशा काळात दूध, दही किंवा दुधापासून तयार झालेले पदार्थ खावे की नाही, अशी अनेकांना शंका असते. आज आपण त्याबद्दलच जाणून घेऊ…
दुधापासून दही आणि दह्यापासून ताक तयार होते. ताक हे सर्वांचे अतिशय आवडते पेय आहे. दुधापासून तयार केलेल्या गोष्टी शरीरासाठी अनेक प्रकारे अत्यंत फायदेशीर मानल्या जातात, ताक हे असेच एक पेय आहे. दही आणि मसाल्यांनी तयार केलेले हे अतिशय चवदार आणि पौष्टिक पेय प्रोबायोटिक्सने समृद्ध आहे.
शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी आणि पचनासह उष्णतेच्या दुष्परिणामांपासून संरक्षण करण्यासाठी हे सर्वात फायदेशीर पेय असू शकते. रोज ताक सेवन करणे फायदेशीर ठरू शकते. पावसाळ्याच्या दिवसांत डायरीया, जुलाब अशाप्रकारचे आजार होण्याची शक्यता असते. पोटाच्या तक्रारींवर दही हा अतिशय उत्तम उपाय असून दह्यातील बॅक्टेरीया बिघडलेले पोट पूर्वस्थितीत आणण्यास मदत करतात.
पावसाळ्यात पोट बिघडल्यावर दही-भात खाण्याचा सल्ला दिला जातो. दह्यामध्ये कॅल्शियम आणि फॉस्फरस मुबलक प्रमाणात असते त्यामुळे हाडे आणि दात यांच्या आरोग्यासाठी दही चांगले असते. दह्याऐवजी ताक पिणे केव्हाही फायद्याचे, त्यामुळे दिवसा ताक प्यायला हरकत नाही. मात्र ते जास्त आंबट आणि गार नसावे.
आयुर्वेद शास्त्रात ताकाची तुलना अमृताशी केलेली आहे. ताक हे शरीरातील घातक पदार्थ मूत्रावाटे बाहेर काढून शरीरात रोग प्रतिकार शक्ती वाढवण्यास मदत करते. ताकाचे नियमित सेवन केल्याने शरीर बलवान होते. महत्वाचे म्हणजे तीन दिवस इतर काहीही न खाता ताक पीत राहल्यास आपल्या शरीराचे पंचकर्म आपोआप होते आणि शरीरातील चरबी निघून जाते, इतकेच नव्हे तर चेहऱ्यावरील काळे डाग जावुन चेहरा तरतरीत व तेजस्वी होतो.
ताकात विटामिन ” B 12 ”, कैल्शियम, पोटेशियम आणि फास्फोरस सारखे तत्व असतात जे शरीरासाठी फारच फायद्याचे असतात. ज्याचे पोट साफ होत नाही आणि पोटातून आवाज येतात त्यांनी ताक पिल्याने असे आजार नाहीसे होतात. ताक प्यायल्यानंतर शरीराची झीज ९० टक्के भरून निघून शरीरातील उष्णता त्वरित कमी होऊन अतिशय शांत झोप लागते. साधारण माणसाने सुध्दा दररोज ताक पायल्याने शरीरातील उष्णता लगेच कमी होते आणि ताकत प्रचंड प्रमाणात वाढते.
ताक पिण्याचे अनेक प्रकारचे फायदे आहेत. ताक प्यायल्याने लठ्ठपणा कमी होतो. वारंवार लघवीचा त्रास होत असेल तर ताकात मीठ टाकून प्यावे. त्रास कमी होतो. दह्याचे पाणी अथवा ताकाने गुळण्या केल्यास तोंड येणे बरे होते. ताकात ओवा टाकून प्यायल्यास पोटातील जंतू मरुन जातात. ताकात गुळ टाकून प्यायल्यास लघवी करताना होणारी जळजळ बंद होते. थोडी जायफळ पूड ताकात टाकून प्यायल्यास डोकेदुखी कमी होते. रिकाम्या पोटी ताक प्यायल्याने पोटदुखी बरी होते.
जेवणात दही असेल तर पोटाला शांत वाटते, दह्यामुळे जेवणाचा स्वाद वाढण्यास मदत होत असल्याचे म्हणत अनेक जण रोजच्या जेवणात दह्यावर ताव मारतात दह्यात प्रोटीन, कॅल्शियम व्हीटॅमिन बी ६, बी १२, आयर्न, मॅग्नेशियम, फॉस्फरस, पोटॅशियम, सोडियम, झिंक, कॉपर, सेलेनियम, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन के, फॅटी ऍसिडस् असे आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त घटक असतात.त्यामुळे ते आरोग्यासाठी चांगले असते असे आधुनिक आरोग्य शास्त्र म्हणते. आहारशास्त्राचे काही नियम असतात, ऋतूनुसार हे नियम बदलतात. हे सर्वांना माहीत असणे आवश्यक ठरते
पावसाळ्यात मात्र दही खावे की नाही याबाबत अनेकांना साशंकता असते. आयुर्वेदानुसार दही पचायला जड असते त्यामुळे रात्री झोपायच्या वेळेला शक्यतो दही खाऊ नयेत. तसेच खूप आंबट, जुने झालेले दही पावसाळ्याच्या दिवसांत खाऊ नये. पावसाळ्यात पचनशक्ती क्षीण झालेली असते अशावेळी दही बेतानेच खायला हवे. दही खायचेच असेल तर कमी प्रमाणात तेही साखर, मध किंवा तूप घालून खावे म्हणजे ते पचायला सोपे होते. तसेच ज्यांना ताप, सर्दी आहे त्यांनी शक्यतो या काळात दही टाळलेले चांगले असते.
Monsoon Rainy Season Health Tips Curd Consumption