शुक्रवार, सप्टेंबर 5, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

अजूनही पावसाचा अंदाज चिंताजनकच… बघा, तज्ज्ञ काय म्हणताय…

by Gautam Sancheti
जुलै 7, 2023 | 6:48 pm
in संमिश्र वार्ता
0
monsoon clouds rain e1654856310975

‘सर्व गोष्टी अति-अनुकूल पण पाऊस घाट माथ्यापर्यन्तच’ असून
अजून आठवडाभर चित्र विशेष आशादायी नाही

जुलै महिना सुरू होऊन जवळपास एक आठवडा लोटत आहे. असे असतानाही राज्याच्या सर्व भागात सर्वदूर पाऊस झालेला नाही. त्यामुळे सर्वत्र चिंतेचे वातावरण आहे. आता सर्वांचे लक्ष जुलै महिन्याकडे लागू न होते. मात्र, अद्यापही पावसाचा अंदाज चिंतानजक असल्याचे दिसून येत आहे.

Manikrao Khule
माणिकराव खुळे, ज्येष्ठ निवृत्त हवामान तज्ञ्, भारतीय हवामान खाते, पुणे. मो. ९४२२०५९०६२, ९४२३२१७४९५

सध्या गेल्या ४ दिवसा (४जुलै) पासून पावसाची सद्यस्थिती काय आहे हे पहावे लागेल.
(i)मान्सून-ट्रफ
(ii)ऑफ-शोर-ट्रफ -गुजरात ते केरळ अ. समुद्र संपूर्ण पश्चिम किनारपट्टी
(iii)१९ डिग्री उत्तर अक्षवृत्त दरम्यानचा ४ ते ६ किमी. उंचीवरील २ किमी हवा जाडीत पूर्व-पश्चिम असा एकमेका विरोधी वाहणारा वारा-दिशा बदल
(iv)अरबी समुद्रातील महाराष्ट्रात-गुजरात कि. पट्टी सीमाक्षेत्र बेचक्यात २ ते ६ किमी.उंचीवरील ४ किमी. हवा जाडीत गोलाकार चक्रीय वारा स्थिती-
(v)झारखंड राज्य भू-भागावर खालच्या पातळीतील उंचीवरील  गोलाकार चक्रीय वारा स्थिती-

मान्सून काळातील ह्या सर्व वातावरणीय पाच मुख्य प्रणाल्या महाराष्ट्रात जोरदार पाऊस पडण्यासाठी अति-अनुकूल असुनही अपेक्षित पाऊस हा फक्त कोकण व सह्याद्रीच्या घाटमाथ्यापर्यंतच मर्यादित राहिला आहे. तर उर्वरित महाराष्ट्रात अगदीच तुरळक ठिकाणीच किरकोळ पाऊस पडत आहे. परंतु जो पडतो आहे तो मान्सूनी पावसाला साजेसा असा अधिक क्षेत्र व्यापकतेचा, दिर्घ कालावधीचा व एका संथ लयीतल्या  पडणाऱ्या गुणधर्माचा जाणवत नाही.

आजपासून पुढील ६ दिवस म्हणजे बुधवार दि.१२ जुलै पर्यन्त, कोकण व पूर्व विदर्भातील ३ जिल्हे वगळता मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यातील १८ जिल्यात पावसाची तीव्रता अजुन कमी होवुन केवळ मध्यमच पावसाची शक्यता जाणवते. पाऊस फक्त घाट माथ्यापर्यंतच मर्यादित आहे.
२० जुलै पर्यन्त अशी अवस्था राहिली तरी आश्चर्य वाटायला नको. २१ जुलै नंतरच्या आठवड्यात मान्सून पुन्हा उर्जीतावस्थेत येऊ शकतो, असे वाटते. तो पर्यन्त ‘ वाट बघा, लक्ष ठेवा ‘ ह्या फेज मधून जावे लागते कि काय, असे वाटते.
अर्थात अंतर्गत वातावरणीय प्रणाली देशाच्या वायव्यकडे जर सरकून उत्तर विदर्भ व पूर्व म. प्रदेश दरम्यान एक- दोन दिवस स्थिरावली तर त्यातून महाराष्ट्राच्या टंचाईग्रस्त मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात चांगल्या पावसाची अपेक्षा करू या!

महाराष्ट्रासाठी जुलै महिन्यात सरासरी पेक्षा अधिक पावसाचा अंदाज असुनही जर आर्धा महिना (१५ जुलै पर्यन्त)अशीच अवस्था असणार असेल आणि उरलेला अर्ध्या महिन्याची सरासरी जर कोकण व पूर्व विदर्भातील ३ जिल्ह्यातील जोरदार पावसाने भरून निघणार असेल तर पाऊस वितरणाची ही असमान विसंगती खरीपातील शेतपीक नियोजनास कुचकामी व धोकादायक ठरु शकते. २१ ते २७ जुलै च्या आठवड्यातील पावसावरच ह्या सरासरीची भिस्त अवलंबून असेल.

मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व पश्चिम विदर्भातील (१०+८+८)२६ जिल्यात  चांगल्या ओलीवरच्या पेरणीसाठी व पेर झालेल्या नाजूक रोपट्यांसाठी पावसाची अजुनही प्रतिक्षा आहे.शेतकरी चातकासारखी पावसाची वाट बघत आहे. अजुन ह्या क्षेत्रात बऱ्याच पेरण्या बाकी आहेत. ज्या संयमी जाणकार शेतकऱ्यांनी राज्य कृषी खाते व केंद्रीय हवामान खात्याच्या सूचनाकडे लक्ष दिले असेच शेतकरी दुबार-पेरणी व वायफळ गुंतूवणूकीपासून सुरक्षित आहेत. अर्थात महाराष्ट्रातील तुरळक काही ठिकाणी बियाणे उतरून पडेल इतपत पेर-योग्य पाऊस ६ व ७ जुलैपर्यन्त झाला आहे. अश्या सर्व ठिकाणी पेर करण्यास हरकत नसावी असे वाटते.
                        मात्र एकदम बाखर ओलीवर मात्र पेरणी  मुळीच करू नये असेही नमूद करावेसे वाटते.

संपूर्ण देशात सध्या ह्या आठवड्यात सगळीकडे जोरदार पाऊस होत आहे. मात्र फक्त कोकण व काहीसा विदर्भ (१० जिल्हे) वगळता उर्वरित महाराष्ट्रातील २६ व सीमांध्रतील रायलसीमा भागातील ८ जिल्ह्यासहित संपूर्ण तामिळनाडू व तेलंगणा राज्यात पावसाचे प्रमाण कमी आहे. त्यातही मान्सून ट्रफ सरासरी जागेपेक्षा उत्तरेकडे सरकणे, तसेच मॅडन जूलीयन ऑसीलेशनही पुढील  २ आठवडे पावसासाठी पूरक जाणवत नाही.

पावसापासून मनुष्य व वित्त हानि होवु नये  व प्रशासनाला कृती-कार्यवाही करता यावी म्हणून ह. खात्याकडून लाल ते पिवळ्या रंगापर्यंत पावसाच्या तीव्रतेनुसार लघु कालावधीचे (५ दिवसाचे) धोक्याचे इशारे (अलर्ट्स)  दिले जातात. परंतु प्रत्यक्ष तो दिवस उजाडेपर्यंत जर वातावरणात काही बदल झाल्यास ह. खात्याकडून  एका पायरीने चढ किंवा उतार करून सुधारणा केली जाते, व तसे सूचित केले जाते. अंदाजाच्या अचूकतेकडे जाण्याचा हा प्रयत्न असतो.

‘ नोआ ‘ म्हणते ८ जून लाच ‘ एल- निनो ‘ विकसित झाला तर ‘ आयएमडी ‘ च्या अहवालनुसार सध्या ‘एन्सो ‘ न्यूट्रल अवस्थेत म्हणजे ना ‘एल -निनो’ ना ‘ ला-निना स्थिती आहे. येणाऱ्या पावसाळ्यात ‘ एल- निनो ‘ विकसित होईल. म्हणजे येणाऱ्या पावसाळ्यात पावसात घट ही होवु शकते. शिवाय ‘ आय.ओ.डी. ही ना ‘ धन ‘ ना ‘ ऋण ‘ अवस्थेत आहे. म्हणजे मान्सूनच्या पावसाठी घातक नसली तरी पूरक ही नाही. ही  देशात वातावरणाची सध्य:स्थिती आहे. एकंदरीत कितीही विधायक व सकारात्मक शक्यता मान्सूनच्या पावसाच्या बाबतीत मांडल्या तरी ‘ स्मरण असावे एल-निनोचे ‘ असेच सध्या म्हणावे लागेल, असे वाटते.

सध्याच्या वातावरणातील ही जटीलता एटमोस्फेरिक फिजिक्स मधील ‘गतिक हवामानशास्र ‘ (डायनॅमिक मिटीओरोलॉजी)उपविषयातील हवामान घटकांची सूक्ष्म पातळीवरील गतिशीलते वर आधारित आहे                          सध्याचा वातावरणीय गुंता-गुंतीचा खेळ हा त्याचाच परिणाम समजावा. सध्या एवढेच येथे मर्यादित विश्लेषण करून थांबावेसे वाटते.

खरे तर वैज्ञानिकांना हे एक आव्हानच वाटू लागले आहे. आणि ह्याच ठिकाणी  वैज्ञानिक हे आव्हान तर स्वीकारतीलच. पण पावसाचा अचूक अंदाज व्यक्त करणेही कसा गुंता-गुंतीचा खेळ असतो,  ह्याचीही नोंद ह्या निमित्ताने जन-सामान्यांच्या मनी असावी असे वाटते.

इतकेच!
माणिकराव खुळे, ज्येष्ठ निवृत्त हवामान तज्ञ्, भारतीय हवामान खाते, पुणे. मो. ९४२२०५९०६२, ९४२३२१७४९५

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत निवडणूक आयोगाने दिले हे स्पष्टीकरण

Next Post

स्कूल व्हॅनला दुचाकीची धडक… चालकासह दोघे गंभीर जखमी, विद्यार्थी किरकोळ जखमी

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

cbi
संमिश्र वार्ता

सीबीआय न्यायालयाने लाचखोरी प्रकरणात एलआयसीच्या या अधिका-याला दिली ४ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा

सप्टेंबर 5, 2025
IMG 20250904 WA0382 1
संमिश्र वार्ता

पुणे अष्टगणेश दर्शन महोत्सव….परदेशी पर्यटकांचा पारंपरिक उत्सवात सहभाग

सप्टेंबर 5, 2025
CM
संमिश्र वार्ता

आता राज्यातील सर्व तालुके आणि गावांमध्ये होणार ‘फार्मर कप’ …१५ हजार शेतकरी उत्पादक गट तयार करण्याचे उद्दीष्ट

सप्टेंबर 5, 2025
A90 LE KV e1757035342319
संमिश्र वार्ता

आयफोनसारख्या डिझाईनसह हा फोन लाँच….६,३९९ रुपये आहे किंमत

सप्टेंबर 5, 2025
Maha Gov logo 07 1 1024x512 1
संमिश्र वार्ता

व्यावसायिक अभ्यासक्रम प्रवेशासाठी जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास उमेदवारांना आता इतकी मुदत…

सप्टेंबर 5, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

या व्यक्तींना आनंदाची वार्ता समजेल, जाणून घ्या, शुक्रवार, ५ ऑगस्टचे राशिभविष्य

सप्टेंबर 4, 2025
IMG 20250904 WA0311
संमिश्र वार्ता

या अभियानासाठी शासनाकडून २४५.२० कोटींची राज्यस्तर ते पंचायत समिती स्तरापर्यंत बक्षीस योजना

सप्टेंबर 4, 2025
Maha Gov logo 07 1 1024x512 1
संमिश्र वार्ता

या जिल्ह्यात सार्वजनिक सुट्टी ५ सप्टेंबर ऐवजी ८ सप्टेंबरला

सप्टेंबर 4, 2025
Next Post
1688734068639

स्कूल व्हॅनला दुचाकीची धडक... चालकासह दोघे गंभीर जखमी, विद्यार्थी किरकोळ जखमी

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011