लाहोर – देशाच्या स्वातंत्र्यदिनीही महिला पाकिस्तानमध्ये सुरक्षित नसल्याची बाब समोर आली आहे. १५ ऑगस्ट रोजी मोठ्या जमावाने एका युवतीची छेड काढण्यात आली. याचा टिकटॉवर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर तब्बल ४०० जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही मुलगी पाकिस्तानी आणि भारतीय दोन्ही ध्वजांसह एका चौकात गेली होती. तिला दोन्ही देशांच्या स्वातंत्र्य दिनाशी संबंधित टिकटॉक व्हिडिओ बनवायचा होता.
सोशल मीडियावर फिरणाऱ्या या संबंधीच्या बातम्यांना पोलिसांनी दुजोरा दिलेला नाही. मात्र लाहोर पोलिसांनी पाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिनी ऐतिहासिक मिनार-ए-पाकिस्तान येथे एका यूट्यूबर मुलीचा छळ आणि गैरवर्तन केल्याबद्दल ४०० जणांवर गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली. विशेष म्हणजे या व्हिडिओ द्वारे पंतप्रधान इम्रान खान आणि पंजाबचे मुख्यमंत्री उस्मान बुजदार यांच्याकडे कारवाई करण्याची मागणी केली आहे
मीनार-ए-पाकिस्तानजवळील आझादी चौकात शेकडो तरुण १४ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्याचा उत्सव साजरा करत असताना ही घटना घडली. यावेळी व्हिडिओमध्ये शेकडो तरुण मुलीला हवेत फेकत असून कपडे फाडत तिचा विनयभंग करताना दिसतात. त्यानंतर व्हिडिओ व्हायरल झाल्यावर पोलिसांनी मुलीला फिर्याद नोंदवायला सांगितले. मात्र ती मुलगी घाबरली होती की, या घटनेचे वर्णन करताना ती रडू लागली.
या मुलीने एफआयआरमध्ये म्हटले आहे की, तिच्या यूट्यूब चॅनेल करिता तिच्या इतर सहा सदस्य स्वातंत्र्यदिनाचा व्हिडिओ बनवण्यासाठी आझादी चौकात गेले होते. तेथे एक व्हिडिओ शूट करत असताना काही विरोधी विचारांचे युवक आले आणि त्यांनी मला छेडण्यास सुरुवात केली. त्यानंतर आम्ही उद्यानात शिरलो तेव्हा संशयित लोकही माझ्या मागे आले, त्यांनी माझे कपडे फाडले आणि असभ्य वर्तन केले. तसेच त्यांनी माझ्या टीमच्या सदस्यांना मारहाण आणि शिवीगाळही केली. या घटनेदरम्यान माझा फोन, सोन्याची अंगठी आणि सुमारे १ लाख ५० रुपयेही हिसकावले असल्याचे मुलीने सांगितले. मात्र व्हिडिओ फुटेजच्या मदतीने संशयितांना लवकरच पकडले जाईल, असे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.