उत्तर प्रदेशमधील छिबरामऊमध्ये सोमवारी जीटी रस्त्याच्या रुंदीकरणासाठी सिंकदरपूर परिसरातील रायपूर येथे मातीचा ढिगारा खोदताना मोहरांनी भरलेला हंडा सापडला. जेसीबीचालक हंडा घेऊन फरार झाला. मातीच्या ढिगा-याजवळ ग्रामस्थांना काही मोहरे सापडले.. त्यांच्या धातूची ओळख पटविली जात आहे. जीटी रोडच्या रुंदीकरणादरम्यान रायपूर गावात मातीचा ढिगारा खोदला जात होता. त्यादरम्यान जेसीबीचालकाला एक घडा सापडला. ग्रामस्थांनी सांगितले की, तो घडा मोहरांनी भरलेला होता. ही माहिती पसरताच घटनास्थळी एकच गर्दी झाली. या मोहरा सोन्या-चांदीच्या आहेत असे समजून जेसीबीचालक घडा घेऊन फरारी झाला. ग्रामस्थांना काही मोहरा सापडल्या आहेत.
मोहरांच्या धातूची ओळख पटविण्याचा प्रयत्न ग्रामस्थ करत आहेत. भारतीय पुरातत्व विभागाला माहिती दिल्याचे काही ग्रामस्थांनी सांगितले. जेसीबीचालकाचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. या प्रकरणी पोलिस निरीक्षक विनोद कुमार मिश्रा सांगतात, त्यांना याबाबत काहीही माहिती नाही.