इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
राज्याच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांचे नाव जवळपास निश्चित असतांना गेल्या काही दिवसांपासून विनोद तावडे व केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहळ यांचे नाव चर्चेत आहे. मराठा मुख्यमंत्री हवा यासाठी या दोन्ही नेत्यांची नावे पुढे आली आहे. पण, मोहळ यांनी सोशल मीडियात एक पोस्ट टाकून त्यांचे खंडण केले आहे.
त्यांनी म्हटले की, समाजमाध्यमांमधून माझ्या नावाची महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदासाठी होणारी चर्चा निर्थरक आणि कपोलकल्पित आहे. आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून लढताना महाराष्ट्र विधानसभा निवडणूक आमचे नेते मा. देवेंद्रजींच्या नेतृत्वात लढलो. महाराष्ट्राच्या जनतेने कौलही ऐतिहासिक दिला आहे.
आमच्या भारतीय जनता पार्टीत पक्षशिस्त आणि पार्टीचा निर्णय सर्वोच्च असतो. असे निर्णय पार्लिमेंटरी बोर्डात एकमतावर घेतले जातात, ना की सोशल मीडियाच्या चर्चेवर ! आणि पार्लिमेंट्री बोर्डात एकदा का निर्णय झाला, तर पार्टीचा निर्णय आमच्यासाठी सर्वोच्च असतो. म्हणूनच माझ्या नावाची सोशल मीडियात होणारी चर्चा अर्थहीन आहे.