नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – 2022-23 या आर्थिक वर्षाच्या शेवटच्या दिवशी सरकारने छोट्या बचत योजनांमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना आनंदाची बातमी दिली आहे. सरकारने छोट्या बचत योजनांचे व्याजदर वाढवले आहेत. नवीन व्याजदर १ एप्रिल २०२३ पासून लागू होतील.
सरकारने जारी केलेल्या ताज्या अपडेटमध्ये, एप्रिल-जून तिमाहीत लहान बचत योजनांवरील व्याजदर 70 bps पर्यंत वाढले आहेत. ज्येष्ठ नागरिक बचत योजना, राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र, सुकन्या समृद्धी योजना, किसान विकास पत्र यासारख्या योजनांमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना सरकारच्या या निर्णयाचा लाभ मिळणार आहे.
बचत योजनेवर व्याजदर असे
ज्येष्ठ नागरिक बचत योजना (SCSS) वरील व्याजदर 8% वरून 8.2% पर्यंत वाढवण्यात आला आहे.
नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट (NSC) वरील व्याजदर 7% वरून 7.7% पर्यंत वाढवण्यात आला आहे.
सुकन्या समृद्धी योजनेवरील व्याजदर 7.6% वरून 8% करण्यात आला आहे.
किसान विकास पत्रावरील व्याजदर 7.2 (120 महिने) वरून 7.5 (115 महिने) करण्यात आला आहे.
https://twitter.com/ddsahyadrinews/status/1641798278718304256?s=20
Modi Government Small Saving Scheme Interest Rate