नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – दुर्मिळ आणि गंभीर आजारांनी ग्रस्त लोकांसाठी गुरुवारी मोठी बातमी समोर आली आहे. साधारणपणे दुर्मिळ आजारांवर उपचारासाठी वापरण्यात येणारी औषधे खूप महाग असतात. या संदर्भात एक मोठा निर्णय घेत सरकारने दुर्मिळ आजारांसाठी वापरल्या जाणार्या औषधांवर 2021 च्या दुर्मिळ आजारांसाठी राष्ट्रीय धोरणानुसार कस्टम ड्युटी फ्री केली आहे. अर्थ मंत्रालयाने अधिसूचना जारी करून याबाबत माहिती दिली आहे.
वैयक्तिक आयातदार देखील या सवलतीचा लाभ घेऊ शकतील, ज्यासाठी त्यांना केंद्र किंवा राज्य आरोग्य सेवा संचालक किंवा जिल्ह्याचे जिल्हा वैद्यकीय अधिकारी/सिव्हिल सर्जन यांचे प्रमाणपत्र सादर करावे लागेल. महागडी औषधे आणि उपचार उपकरणांमुळे दुर्मिळ आजारांवर उपचार मिळू न शकणाऱ्या लोकांना या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.
हे लक्षात घ्यावे की यापूर्वी सरकारने स्पाइनल मस्कुलर ऍट्रोफी किंवा ड्यूचेन मस्क्यूलर डिस्ट्रॉफी यांसारख्या दुर्मिळ आजारांच्या उपचारांसाठी निर्दिष्ट औषधांना आधीच सूट दिली होती. वित्त मंत्रालयाने अधिसूचनेत म्हटले आहे की, इतर दुर्मिळ आजारांवर उपचार करण्यासाठी वापरल्या जाणार्या औषधांवर आणि उपचारांसाठी आवश्यक असलेल्या विशेष खाद्यपदार्थांवरील सीमाशुल्कात सवलत मागणारे अनेक संदर्भ सरकारला मिळाले आहेत. यापैकी अनेक रोगांसाठी औषधे खूप महाग आहेत आणि ती आयात करावी लागतात. अशा रुग्णांच्या उपचारासाठी खर्च होणारी मोठी रक्कम कमी करण्यासाठी हा निर्णय उपयुक्त ठरणार आहे.
एका अंदाजानुसार, 10 किलो वजनाच्या मुलाला दुर्मिळ आजार असल्यास त्याच्या उपचारासाठी वार्षिक 10 लाख ते 1 कोटींहून अधिक खर्च येऊ शकतो. उपचार आजीवन देखील आवश्यक असू शकतात, ज्यामुळे औषधाची किंमत खूप जास्त आहे. वय आणि वजन, डोस आणि त्याच्या समांतर औषधांचा खर्चही वाढतच जातो. ते कस्टम ड्युटी फ्री असल्याने औषधांच्या किमतीत कपात होणार आहे, ज्याचा थेट फायदा रुग्णाच्या उपचारावर खर्च होणारी रक्कम कमी करण्यासाठी होणार आहे.
https://twitter.com/FinMinIndia/status/1641307007260164096?s=20
केंद्र सरकारने सर्वसाधारण सवलत अधिसूचनेद्वारे राष्ट्रीय धोरण 2021 अंतर्गत सूचीबद्ध सर्व दुर्धर आजारांबाबत विशेष वैद्यकीय चिकित्सा, वैयक्तिक उपचारासाठी आयात केल्या जाणाऱ्या सर्व औषधे आणि खाद्यान्नावरील सीमाशुल्कात पूर्णपणे सूट दिली आहे.
या सवलतीचा लाभ घेण्यासाठी, वैयक्तिक आयातदाराला केंद्रीय किंवा राज्याचे आरोग्य सेवा संचालक किंवा जिल्हा वैद्यकीय अधिकारी/सिव्हिल सर्जन यांचे प्रमाणपत्र सादर करावे लागेल. औषधांवर साधारणपणे 10% मूलभूत सीमा शुल्क आकारले जाते, तर काही जीवनरक्षक औषधे/ लस यांना 5% किंवा शून्य सवलतीच्या दर आकारला जातो.
पाठीच्या कण्यासंबंधित स्नायू विकार, स्पायनल मस्कुलर ऍट्रोफी किंवा स्नायू विकार, ड्यूशेन मस्कुलर डिस्ट्रॉफीच्या उपचारांसाठी निर्देशित औषधांना आधीच सूट प्रदान केली आहे. अशात, इतर दुर्धर रोगांवर उपचार करण्यासाठी वापरल्या जाणार्या औषधांसाठी सीमाशुल्कात सवलत मिळावी यासाठी सरकारला अनेक निवेदने प्राप्त होत आहेत. या रोगांवरील औषधे किंवा विशेष अन्न, उपचार महाग असून ते आयात करणे आवश्यक आहे. काही दुर्धर आजारांमधे 10 किलो वजनाच्या बालकासाठी उपचारांचा वार्षिक खर्च 10 लाख ते 1 कोटी रुपयांपेक्षा जास्त असू शकतो असा अंदाज आहे. औषधांची मात्रा आणि खर्च, वय तसेच वजनानुसार आजीवन वाढताच असतो.
या सवलतीमुळे रुग्णांच्या खर्चात मोठ्या प्रमाणात बचत होईल आणि त्यांना दिलासा मिळेल. सरकारने विविध कर्करोगाच्या उपचारात वापरल्या जाणार्या पेम्ब्रोलिझुमॅबला (कीट्रूडा) मूलभूत सीमा शुल्कातून पूर्णपणे सूट दिली
Modi Government Rare and Serious Disease Drugs Custom Duty