नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सरकारी कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीचे वय काय असावे? यासंदर्भात नेहमीच मतभेद असतात, त्यावरून वादविवाद देखील होतात. तसेच पेन्शनची रक्कम किती असावी? या संदर्भातही चर्चा होत असते. काही केंद्र सरकार लवकरच कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय आणि पेन्शनची रक्कम वाढवली जाऊ शकते. हा प्रस्ताव पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आर्थिक सल्लागार समितीने दिला आहे. या प्रस्तावामध्ये देशातील लोकांची काम करण्याची वयोमर्यादा वाढवण्याबाबत म्हटले आहे. यासोबतच पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार समितीने म्हटले आहे की, देशात निवृत्तीचे वय वाढवण्यासोबतच युनिव्हर्सल पेन्शन सिस्टीमही सुरू केली पाहिजे.
रिपोर्टनुसार, या सूचनेनुसार कर्मचाऱ्यांना दरमहा किमान २ हजार रुपये पेन्शन दिली पाहिजे. आर्थिक सल्लागार समितीने देशातील ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेसाठी उत्तम व्यवस्था करण्याची शिफारस केली आहे. या रिपोर्टनुसार काम करण्याच्या वयाची लोकसंख्या वाढवायची असेल तर निवृत्तीचे वय वाढवण्याची नितांत गरज आहे. सामाजिक सुरक्षा व्यवस्थेवरील दबाव कमी करण्यासाठी हे केले जाऊ शकते. रिपोर्टमध्ये ५० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींसाठी कौशल्य विकासाबाबतही सांगितले आहे.
तसेच, पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार समितीने असाही सल्ला दिला की, देशात सेवानिवृत्तीचे वय वाढवण्याबरोबरच युनिव्हर्सल पेन्शन सिस्टीमही सुरू करावी. तसेच समोर आलेल्या अहवालानुसार, या सूचनेनुसार कर्मचाऱ्यांना दरमहा किमान दोन हजार रुपये पेन्शन देण्यात यायला हवे. आर्थिक सल्लागार समितीने देशातील ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेसाठी चांगल्या व्यवस्थेची शिफारस देखील केली आहे.
दरम्यान, कामावर असण्याचे वय वाढवायचे असेल केंद्र आणि राज्य सरकारने अशी धोरणे बनवावी जेणेकरून कौशल्य विकास होऊ शकेल. या प्रयत्नात असंघटित क्षेत्र, दुर्गम भागात राहणारे स्थलांतरित ज्यांच्याकडे प्रशिक्षण घेण्याचे साधन नाही, पण त्यांना प्रशिक्षित करण्याची गरज आहे, असे या आहवालात म्हटले आहे.
केंद्र आणि राज्य सरकारने अशी धोरणे तयार करावीत जेणेकरून कौशल्य विकास करता येईल, असे या रिपोर्टमध्ये म्हटले आहे. या प्रयत्नात असंघटित क्षेत्रात राहणारे, दुर्गम भागात राहणारे, निर्वासित, स्थलांतरित ज्यांच्याकडे प्रशिक्षण घेण्याचे साधन नाही, अशांचाही समावेश व्हायला हवा, पण त्यांना प्रशिक्षण देण्याची गरज आहे. विशेष म्हणजे, वर्ल्ड पॉप्युलेशन प्रॉस्पेक्टस 2019 नुसार, 2050 पर्यंत भारतात जवळपास 32 कोटी ज्येष्ठ नागरिक होतील. म्हणजेच देशातील सुमारे 19.5 टक्के व्यक्ती सेवानिवृत्तीच्या कॅटगरीत येतील. 2019 मध्ये भारताच्या लोकसंख्येच्या जवळपास 10 टक्के किंवा 14 कोटी लोक ज्येष्ठ नागरिकांच्या वर्गात आहेत.
Modi Government Big Decision Soon for Retirement Age and Pension