नवी दिल्ली – भारत सरकारने २०२० च्या दुस-या सहामहीमध्ये ४०,३०० वेळा युजर्सचा डाटा देण्याची मागणी केली होती, असा दावा जगातील सर्वात मोठे सोशल मीडियाचे व्यासपीठ असलेल्या फेसबुकने केला आहे. कंपनीच्या नैतिक (एथिक्स) समितीच्या या अहवालानुसार, अमेरिकेने सर्वाधिक म्हणजेच ६१,२६२ वेळा विनंती केल्यानंतर भारताने केलेले आग्रह दुस-या स्थानावर आहे.
या अहवालानुसार, भारताकडून पहिल्या सहामहीमध्ये ३५,५६० वेळा केल्या गेलेल्या मागणीच्या आकड्यांपेक्षा नंतर केल्या गेलेल्या मागण्या १३.३ टक्के अधिक आहे. आपल्या पारदर्शक अहवालात फेसबुकने नमूद केले आहे की, भारत सरकारच्या सांगण्यानुसार ८७८ वेळा ऑनलाइन कंटेंटवर बंदी घालण्यात आली. त्यापैकी १० जणांवर कायमस्वरूपी तर ५४ जणांवर न्यायालयाच्या आदेशावरून बंदी लावण्यात आली.
सरकारने माहिती तंत्रज्ञान अधिनियमच्या कलम ६९ अ चे उल्लंघन झाल्याचे सांगत कंटेटवर बंदी घालण्याची मागणी केली होती. अशा प्रकारचा कंटेंट देशाचे संरक्षण आणि लोकव्यवस्थेविरुद्ध आहे, असे सरकारचे म्हणणे होते.
कायदेशीर कारवाईसाठी सरकारने ३७,८६५ वेळा युजरच्या डाटा मागितला होता. २,४३५ वेळा आपत्कालीन गरजेअंतर्गत मागितला. २०२० च्या दुस-या सहामाहीमध्ये जगात १,९१,०१३ वेळा युजर्सचा डाटा मागण्यात आला. हा डाटा पहिल्या सहामाहीच्या १० टक्के अधिक आहे.
गेल्यावर्षी मागितली ६२,७५४ अकाउंटची माहिती