शुक्रवार, ऑक्टोबर 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

मोदी सरकारची शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा; कृषी कर्जावर मिळणार एवढी सवलत

ऑगस्ट 18, 2022 | 11:24 am
in मुख्य बातमी
0
farmer

 

नवी दिल्‍ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने देशभरातील शेतकऱ्यांना मोठीच खुषखबर दिली आहे. तीन लाख रुपयांपर्यंतच्या अल्प मुदतीच्या कृषी कर्जावर वार्षिक दीड टक्के व्याज सवलती देण्याच्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. त्याचा फायदा लाखो शेतकऱ्यांना होणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने सर्व वित्तीय संस्थांसाठी अल्प मुदतीच्या कृषी कर्जावर 1.5 टक्के व्याज सवलत देण्यास मंजुरी दिली आहे. 2022-23 ते 2024-25 या आर्थिक वर्षासाठी शेतकऱ्यांना 3 लाख रुपयांपर्यंतचे अल्प मुदतीचे कृषी कर्ज देणाऱ्या संस्थांना (सार्वजनिक क्षेत्रातील बँका, खाजगी क्षेत्रातील बँका, लघु वित्त बँका, प्रादेशिक ग्रामीण बँका, सहकारी बँका आणि व्यावसायिक बँकांशी थेट जोडलेल्या संगणकीकृत प्राथमिक कृषी पतसंस्था ) 1.5% व्याज अनुदान दिले जाईल. या योजनेअंतर्गत 2022-23 ते 2024-25 या कालावधीसाठी या वाढीव व्याज सवलतीसाठी 34,856 कोटी रुपयांच्या अतिरिक्त अर्थसंकल्पीय तरतुदीची आवश्यकता आहे.

व्याज सवलतीत वाढ केल्यामुळे कृषी क्षेत्रात दीर्घकाळासाठी कर्ज पुरवठा सुनिश्चित होईल तसेच कर्ज पुरवठा करणाऱ्या संस्थांचे विशेषत: प्रादेशिक ग्रामीण बँका आणि सहकारी बँकांचे आर्थिक आरोग्य आणि व्यवहार्यता सुनिश्चित होईल आणि परिणामी ग्रामीण अर्थव्यवस्थेत पुरेसा कृषी कर्ज पुरवठा सुनिश्चित होईल.

निधीचा वाढीव खर्च पेलण्यासाठी बँका सक्षम होतील आणि शेतकऱ्यांना अल्प मुदतीचे कृषी कर्ज देण्यासाठी बँकांना प्रोत्साहित केले जाईल. यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांना कृषी कर्जाचा लाभ मिळू शकेल. पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय, कुक्कुटपालन, मत्स्यपालनासाठी देखील अल्प मुदतीचे कृषी कर्ज पुरवले जाणार असल्यामुळे रोजगार निर्मितीलाही चालना मिळेल. कर्जाची वेळेत परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना वार्षिक 4% व्याजदराने अल्प मुदतीच्या कृषी कर्जाचा लाभ यापुढेही मिळणार आहे.

शेतकऱ्यांना स्वस्त दरात सुरळीत कर्ज पुरवठा सुनिश्चित करण्याला केंद्र सरकारचे सर्वोच्च प्राधान्य आहे. त्यालाच अनुसरून शेतकर्‍यांसाठी किसान क्रेडिट कार्ड योजना सुरू करण्यात आली, जेणेकरून त्यांना केव्हाही क्रेडिट कार्डवर कृषी उत्पादने आणि सेवा खरेदी करता येतील. शेतकर्‍यांना बँकेकडून कमी व्याजदराने अल्पमुदतीचे कर्ज मिळावे यासाठी केंद्र सरकारने व्याज सवलत योजना (ISS) सुरू केली, ज्याचे नामकरण आता सुधारित व्याज सवलत योजना असे करण्यात आले आहे.

या योजनेंतर्गत कृषी आणि पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय, कुक्कुटपालन, मत्स्यपालन आदी संलग्न व्यवसायात गुंतलेल्या शेतकऱ्यांना 3 लाख रुपयांपर्यतचे अल्प मुदतीचे कृषी कर्ज वार्षिक 7% दराने मिळते. कर्जाची त्वरीत आणि वेळेवर परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना अतिरिक्त 3% सवलत देखील दिली जाते. त्यामुळे, जर एखाद्या शेतकऱ्याने वेळेवर कर्जाची परतफेड केली, तर त्याला वार्षिक 4% दराने कर्ज मिळते. शेतकर्‍यांना या सुविधेचा लाभ व्हावा यासाठी केंद्र सरकार या योजनेसाठी कर्ज पुरवठा करणाऱ्या वित्तीय संस्थांना व्याजात सवलत देते . हे सहाय्य 100% केंद्र पुरस्कृत आहे. अर्थसंकल्प तरतूद आणि लाभार्थ्यांच्या संख्येच्या बाबतीत कृषी सहकार्य आणि शेतकरी कल्याण विभागाची ही दुसरी सर्वात मोठी योजना आहे.

अलिकडेच, आत्मनिर्भर भारत अभियानाअंतर्गत 3.13 कोटींहून अधिक शेतकऱ्यांना नवीन किसान क्रेडिट कार्ड जारी करण्यात आली. यासाठीचे लक्ष्य 2.5 कोटी होते. पीएम किसान योजनेंतर्गत नावनोंदणी केलेल्या शेतकऱ्यांसाठी केसीसी सॅच्युरेशन मोहीम सारख्या विशेष उपक्रमांनी किसान क्रेडिट कार्ड मंजूर करण्‍याची प्रक्रिया आणि आवश्यक कागदपत्रे देखील आणखी सुलभ केली आहेत.

बदलती आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन, विशेषत: वित्तीय संस्था, सहकारी बँका आणि प्रादेशिक ग्रामीण बँकांसाठी व्याजदर आणि कर्जदरात वाढ झाल्यामुळे सरकारने या वित्तीय संस्थांना दिल्या जाणाऱ्या व्याज सवलतीच्या दरांचा आढावा घेतला . यामुळे शेतकऱ्याला कृषी क्षेत्रात पुरेसा कर्ज पुरवठा सुनिश्चित होईल तसेच कर्ज पुरवठा करणाऱ्या संस्थांचे आर्थिक आरोग्य सुधारेल अशी अपेक्षा आहे. हे आव्हान पेलण्यासाठी केंद्र सरकारने सर्व वित्तीय संस्थांना अल्प मुदतीच्या कृषी कर्जावर 1.5% व्याज सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे.

Modi Cabinet Bog Decision for Farmers Loan

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नाशिक जिल्ह्यातील धरणातील पाणीसाठ्याची ही आहे स्थिती

Next Post

RTO अधिकाऱ्याकडे मायाच माया… १० हजार चौफूटचा बंगला.. ६ आलिशाने घरे.. १ फार्म हाऊस… सोने, रोकड अन् बरंच काही…

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

CM
मुख्य बातमी

विजयादशमी, धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या मुख्यमंत्र्यांनी अशा दिल्या शुभेच्छा….

ऑक्टोबर 2, 2025
jalaj sharama
स्थानिक बातम्या

अनुकंपासह एमपीएससीच्या शिफारसपात्र ४८५ उमेदवारांना मिळाली नोकरीची संधी

ऑक्टोबर 2, 2025
rain1
महत्त्वाच्या बातम्या

८ ऑक्टोबर पासून राज्यातून मान्सून निरोप घेणार…

ऑक्टोबर 2, 2025
प्रातिनिधीक संग्रहित फोटो
इतर

नगरपरिषद, नगरपंचायती प्रारूप मतदार यादी ८ ऑक्टोबरला प्रसिद्ध होणार

ऑक्टोबर 2, 2025
Untitled
संमिश्र वार्ता

जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी १३ ऑक्टोबरला आरक्षण सोडत

ऑक्टोबर 2, 2025
st bus
महत्त्वाच्या बातम्या

राज्यातील पूरपरिस्थितीमुळे १० टक्के एसटी भाडेवाढीचा निर्णय रद्द…

ऑक्टोबर 2, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

या व्यक्तींच्या कार्यास गती येईल, जाणून घ्या, गुरुवार, २ ऑक्टोंबरचे राशिभविष्य

ऑक्टोबर 2, 2025
mantralay wallpaper.jpg 1024x575 1
संमिश्र वार्ता

कर्करोग उपचारासाठी सर्वसमावेशक धोरण….राज्यभरातील या १८ रुग्णालयांमध्ये मिळणार दर्जेदार उपचार

ऑक्टोबर 1, 2025
Next Post
Faagf3hUsAAS Yk

RTO अधिकाऱ्याकडे मायाच माया... १० हजार चौफूटचा बंगला.. ६ आलिशाने घरे.. १ फार्म हाऊस... सोने, रोकड अन् बरंच काही...

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011