विशेष प्रतिनिधी, मुंबई
केंद्रातील मोदी सरकार दुसऱ्या टर्मची द्विवर्षपूर्ती पूर्ण करीत असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसनेही या सरकारचे मूल्यमापन करण्याचे काम सुरू केले आहे. त्यासाठी राष्ट्रवादीने चक्क सर्वेक्षणच सुरू केले आहे. ट्विटरच्या माध्यमातून नागरिकांची मते जाणून घेतली जात आहेत. गेल्या दोन वर्षातील मोदी सरकारचा कारभार नक्की कसा आहे, हे याद्वारे जाणून घेतले जाणर आहे. कोरोनाच्या संकटामुळे मोदी सरकारची प्रतिष्ठा पूर्णपणे पणाला लागली आहे. हे संकट अयोग्य पद्धतीने हाताळल्याने विरोधकांकडून मोदींसह केंद्र सरकार लक्ष्य केले जात आहे. त्यातच इंधनासह खाद्य तेलांचे दरही लक्षणीयरित्या वाढले आहेत. या सर्व बाबींची दखल घेत राष्ट्रवादीने सर्वेक्षण सुरू केले आहे.
https://twitter.com/NCPspeaks/status/1398915429481934849