मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- शाश्वतता व पर्यावरणाच्या रक्षणाप्रती आपली बांधिलकी अधिक दृढ करत, माँडेलीझ इंडियाने रोजी गोव्यातील म्हापसा येथे ‘लाइटहाउस प्रोजेक्ट’ला अधिकृतरित्या सुरुवात केली. त्यावेळी गोव्याचे माननीय मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत उपस्थित होते. गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि म्हापसा नगरपालिका यांच्या सहयोगाने राबवल्या जाणाऱ्या या पाच वर्षांच्या उपक्रमाचे कचरा व्यवस्थापनातील महत्त्वाच्या आव्हानांवर मात करण्याचे आणि वर्तुळाकार अर्थव्यवस्थेत योगदान देण्याचे उद्दिष्ट आहे. १,००० मेट्रिक टनांहून अधिक प्लास्टिक कचरा अन्यत्र वळवण्याचे काम हा प्रकल्प करत आहे.
गोव्याचे माननीय मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले, “‘मला गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळासोबत सहयोगाने मॉंडेलीझ इंडियाच्या सीएसआर उपक्रमांतर्गत लाइटहाऊस प्रोजेक्ट फॉर प्लास्टिक्स सर्क्युलॅरिटी लॉंच करण्याचा आनंद झाला. या प्रकल्पाचा मपुसामधील कचरा व्यवस्थापनामध्ये आमूलाग्र बदल घडवून आणण्याचा मनसुबा आहे, तसेच प्लास्टिक कचरा व्यवस्थापनामधील चक्रियतेवर लक्ष केंद्रित आहे.”
माँडेलीझ इंडियाचे अध्यक्ष श्री. समीर जैन म्हणाले, “शाश्वतता हा आपल्या देशाच्या धोरणात्मक वाढीच्या स्तंभांपैकी एक आहे. लाइटहाउस प्रकल्पातून आमची प्लास्टिकच्या पुनर्वापराप्रती बांधिलकी स्पष्ट होते. शाश्वत कचरा व्यवस्थापनाच्या सरकारच्या उद्दिष्टाशी हे सुसंगत आहे. हा प्रकल्प तीन महत्त्वाच्या स्तंभांवर उभा आहे-वर्तनातील बदल, पायाभूत सुविधांचे अद्ययावतीकरण आणि डिजिटल नवोन्मेष. कचरा संकलनात सुधारणा, शाश्वततेला उत्तेजन आणि लोकांचा सहभाग यांच्या माध्यमातून आम्ही व्यापक वर्तुळाकार अर्थव्यवस्थेसाठी पार्श्वभूमी तयार करत आहोत.”
उद्घाटन सोहळ्यात गोव्याचे माननीय मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते १०० टक्के रिसायकल्ड प्लास्टिकपासून तयार करण्यात आलेल्या ‘द फिशरमन कास्टिंग नेट’ या प्रेरणादायी कलात्मक मांडणशिल्पाचे अनावरण करण्यात आले. या अनन्यसाधारण कलाकृतीतून समुद्राजवळ जन्मलेल्या व वाढलेल्या समुदायांच्या उपजीविकेचे वर्णन केले जाते.
पर्यावरणाच्या संवर्धनात दीर्घकाळ टिकणारा प्रभाव निर्माण करण्यासोबतच, जागरूकता मोहिमा व संवेदनशीलता विकसित करण्याच्या प्रयत्नांद्वारे वर्तनात्मक बदलांना चालना देण्यावरही या प्रकल्पाचा भर आहे. यासाठी ५०,०००हून अधिक रहिवासी तसेच औपचारिक व अनौपचारिक स्वच्छता कामगारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. या उपक्रमांच्या माध्यमातून म्हापशामध्ये कचरा व्यवस्थापनाचे काम करणाऱ्यांमधून १२०हून अधिक सफाई मित्रांचा समावेश या प्रकल्पात करण्यात आला आहे, वर्तुळाकार कचरा अर्थव्यवस्थेत महत्त्वपूर्ण योगदान देण्याची क्षमता त्यांच्यात विकसित केली जात आहे.
लाइटहाउस प्रोजेक्टमध्ये काही समुदायाधारित उपक्रमांचाही समावेश आहे. उदाहरणार्थ, पर्यावरण संवर्धनाच्या प्रयत्नांमध्ये जनतेला सहभागी करून घेण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आलेल्या स्वच्छतेच्या व कचरा गोळा करण्याच्या मोहिमा. या प्रकल्पाने शाळा व कॉलेजांमध्येही संपर्क केला आहे. त्याद्वारे प्लास्टिक कचऱ्याच्या वर्तुळाकार वापराशी बांधील अशा तरुण दुतांची एक पिढी निर्माण करण्याचे उद्दिष्ट प्रकल्पाने ठेवले आहे. विद्यार्थ्यांमध्ये शाश्वततेप्रती जागरूकता जोपासणाऱ्या शैक्षणिक उपक्रमांचा लाभ या भागातील शाळांना होणार आहे.