मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर असलेल्या उर्फी जावेद हीच्यासोबत विमानप्रवासादरम्यान गैरवर्तन करणाऱ्या टवाळखोरांना जशास तसे उत्तर दिले आहे. तिच्या या प्रत्युत्तराने दृष्कृत्य करू पाहणाऱ्यांना चांगलाच चाप बसला आहे.
वादग्रस्त वक्तव्ये, हटके फॅशन स्टाइल यांमुळे उर्फी जावेद कायम चर्चेत राहिली आहे. तिच्या स्टेटमेंट आणि स्टाइलमुळे ती सदैव वादातदेखील अडकते. नुकताच हवाईप्रवासादरम्यान तिच्यासोबत अत्यंत भयंकर असा प्रकार घडला. उर्फीने विमानातील व्हिडिओ शेअर करत तिच्याशी गैरवर्तन करणाऱ्या पुरुषांचा चेहरा उघड केला आहे. हा व्हिडिओ शेअर करत तिने न देखील शेअर केली आहे. उर्फीने या नोटमध्ये लिहिले आहे की, ‘काल एका फ्लाईटमध्ये मुंबई ते गोवा प्रवास करताना मला एक वाईट अनुभव आला. मला खूप त्रास सहन करावा लागला. या व्हिडिओतील पुरुष अश्लील भाषेत काही बोलत आहेत. छेडत होते. वेगवेगळ्या नावांनी हाक देत होते. जेव्हा मी त्यांना टोकले, तेव्हा त्यांच्यापैकी एकाने सांगितले की, त्यांचा मित्र नशेत आहे. मद्यधुंद असताना स्त्रियांशी गैरवर्तन करणे हे यामागचे स्पष्टीकरण असू शकत नाही. पब्लिक फिगर आहे, पब्लिक प्रॉपर्टी नाही.’ उर्फीने हा व्हिडिओ म्युट करून शेअर केला आहे. उर्फी नेहमीच चर्चेत असते. ती बिग बॉस आणि स्प्लिट्सविला या रिऍलिटी शोमध्ये दिसली होती. उर्फी तिच्या विच्या आणि डीआयवाय फॅशनची ओळखली जाते. तर उर्फी अनेकदा गरजूंना मदत करताना देखील दिसते.
किशोरवयात आली पोर्न साइटवर
उर्फी ही किशोरवयात असतानाच फोटो पोर्न साइटवर झळकली होती. तिचे फोटो त्यावर दिसले होते. त्याबद्दल ती म्हणते,‘मी १५ वर्षांची असताना, कोणीतरी माझे फोटो एका पॉर्न साइटवर अपलोड केले. तो एक नॉर्मल फोटो होता. मी माझ्या फेसबुक प्रोफाइलवर ट्यूब टॉप घातलेला फोटो अपलोड केला होता. कोणीतरी तो डाउनलोड केला आणि मॉर्फ न करता, एडिट न करता पॉर्न साइटवर अपलोड केले. हळूहळू, सर्वांना याची माहिती मिळाली.’