इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – सतत अत्यंत कमी कपड्यांमध्ये राहण्यामुळे उर्फी जावेदची मोठी चर्चा होत असते. अनेकदा तिची खिल्लीही उडवली जाते. दररोज ती कुठल्या ना कुठल्या अत्यंत कमी कपड्यांचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करते. त्यामुळेही त्याची जोरदार चर्चा होते. अनेकांना वाटते की उर्फी ही बावळट आहे. मात्र, असे समजण्याची तुम्ही चूक करु नका. कारण, तिच्या महिन्याभराची कमाई आणि तिची एकूण संपत्ती जाणून तुम्ही थक्कच व्हाल
आपल्या विचित्र कपड्यांमुळे चर्चेत असलेली उर्फी जावेद सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल होत आहे. तिच्या प्रत्येक पोस्टवर नेटकरी तिला योग्य कपडे घालण्याचा सल्ला देतात. आणि नग्नता पसरवू नका, असे आवाहन करतात. उर्फी जावेदची तिच्या असामान्य कपड्यांमुळे खिल्ली उडवली जाते, परंतु उर्फी जावेद एका महिन्यासाठी किती कमावते हे तुम्हाला माहिती आहे का? तुम्हाला तिची फी आणि नेट वर्थ माहित आहे का?
आपल्या बोलण्या आणि स्टाईलने दररोज हेडलाइन्स बनवणारी उर्फी जावेद वेगवेगळ्या प्रोजेक्ट्स आणि जाहिरातींमधून दर महिन्याला तब्बल 2 कोटी ते 22 कोटी रुपये कमावते. बॉलीवूड लाईफमधील एका रिपोर्टनुसार उर्फी जावेदची मासिक कमाई तिला मिळणाऱ्या प्रोजेक्ट्सवर अवलंबून असते.
बिग बॉस ओटीटीचा भाग असलेली उर्फी जावेद टीव्ही शोमधील एका एपिसोडसाठी २५ ते ३० हजार रुपये घेते. ‘कसौटी जिंदगी की’ या टीव्ही शोचा भाग असलेल्या उर्फीने त्या शोसाठी सुमारे 40 ते 55 लाख रुपये आकारले होते. उर्फी ही विविध उत्पादनांसाठी मॉडेलिंग आणि जाहिराती देखील करते. त्यासाठी ती भरमसाठ फी देखील घेते. जसे की ब्रा, निकर किंवा स्वीम सूट, इनर विअर वैगेरे..
उर्फी जावेद ही मुंबईत एका आलिशान फ्लॅटमध्ये राहते. तिच्याकडे अनेक आलिशान वाहने आहेत. उर्फी जावेदच्या आतापर्यंतच्या प्रोजेक्ट्सबद्दल बोलायचे झाले तर, ती मेरी दुर्गा, बेपन्ना, ए मेरे हमसफर, बडे भैया की दुल्हन या टीव्ही शोचा ती भाग आहे. उर्फी जावेदला तिच्या लूकसाठी दररोज ट्रोल केले जाते, परंतु या प्रकरणात उर्फी स्पष्टपणे सांगते की, ती लक्ष वेधण्यासाठी नाही तर तिच्या आनंदासाठी असे करते.