इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – चित्रविचित्र कपडे घातल्याने, सामाजिक भान न पाळल्याने ऊर्फी जावेद नेहमीच चर्चेत त्याहूनही जास्त वादात असते. तिच्याभोवतीचा एक वाद संपत नाही तोवर एक नवीन वाद जन्माला आलेला असतो. आता पुन्हा एकदा ऊर्फी वादात सापडली आहे. यावेळचे कारण देखील भन्नाट आहे.
कितीही टीका होत असली तरी ऊर्फीचे फॅन फॉलोइंग जबरदस्त आहे. सोशल मीडियावर क्वीन असलेल्या उर्फीच्या आत्मविश्वासाचं अनेकजण कौतुक करतात. तर काही जण तिच्या ड्रेसिंग सेन्सची खिल्ली उडवतात. मात्र कशालाच न जुमानता उर्फी नेहमीच आपला फॅशन सेन्स (?) कॅरी करत असते. आपल्या फॅशन सेन्समुळे ऊर्फी केवळ सर्वसामान्यांच्याच नाही तर सेलिब्रिटींच्याही निशाण्यावर आली आहे. त्यापैकीच एक फैजान अन्सारी. फैजानला अनेकदा उर्फीच्या विरोधात बोलताना पाहिलं गेलंय. आता फैजन अन्सारीने केलेल्या दाव्यामुळे उर्फी नव्या वादात सापडण्याची चिन्हे आहेत.
फैजान अन्सारी एक सोशल मीडिया इन्फ्लूऐजर आहे. फैजानने आजवर अनेकदा उर्फीवर टीका केली आहे. आता फैजानने उर्फी जावेदला थेट किन्नर म्हटलं आहे. इतकंच नव्हे तर ही बाब सिद्ध करण्यासाठी आपल्याकडे भक्कम पुरावे असल्याचा दावाही त्याने केला आहे. या पुराव्यांना तो लवकरच कोर्टात सादर करणार आहे.
नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत फैजान म्हणाला, “माझ्याकडे पुरावे आहेत, ज्यांच्या आधारे मी देशासमोर मोठा खुलासा करणार आहे. उर्फी जावेद ही मुलगी नाही तर किन्नर आहे. माझा तिच्यासोबत आधीपासूनच वाद सुरू होता, मात्र आता तो हायकोर्टापर्यंत पोहोचला आहे. मी आता थेट कोर्टात तिच्याविरोधातील पुरावे सादर करणार आहे. किन्नर समाजाच्या प्रमुखांनाही मी कोर्टात बोलावणार आहे, असे त्याने म्हटले आहे.
फैजानने पुढे म्हणतो की, “माझ्या टीमने उर्फीशी बोलण्याचा प्रयत्न केला, मात्र ती प्रत्येकाशी उद्धटपणे वागते. ती म्हणते की तिला मुस्लिम समाजाशी काही घेणं देणं नाही. त्यामुळे आता तिच्याशी बोलून काही उपयोग नाही. तिला थेट धडा शिकवावा लागेल. ती एक मुस्लिम असून आमचं नाव अशा पद्धतीने खराब करतेय. मी तिला समजावण्याचा खूप प्रयत्न केला. मात्र त्याचा काहीच उपयोग झाला नाही. त्यामुळे लवकरात लवकर मीच लोकांसमोर सत्य आणेन. आता फैजान या दाव्यावर उर्फी काय बोलणार? फैजान न्यायालयात धाव घेत उर्फीविरोधात पुरावे सादर करणार का? असे अनेक प्रश्न आता उभे राहिले आहेत.
Model Urfi Javed is not Girl Actor Claim