इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – अभिनेत्री (?) उर्फी जावेद ही नेहमीच चर्चेत असते. चित्रविचित्र कपडे घालून रस्त्यावर फिरणे हा तिचा आवडता छंद आहे. यामुळेच मध्यंतरी ती ट्रोल झाली होती. भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनीदेखील तिच्याविरोधात आवाज उठवला होता. तिच्या अशा वागण्याविरोधात महिला आयोगात तक्रारही दाखल करण्यात आली होती. त्यानंतर उर्फी एकदा पूर्ण कपड्यांमध्ये दिसली होती. पण, त्यानंतर ती पूर्वपदावर आलेली दिसते. आता पुन्हा एकदा उर्फी ट्रोल होते आहे.
उर्फीचा आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे. यात उर्फीने अश्लील इशारे करत बोल्ड वक्तव्य केलं आहे. उर्फी जावेद ही सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. ‘इन्स्टंट बॉलिवूड’ या इन्स्टाग्राम पेजने उर्फीचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओत उर्फी एका शूटींगच्या लोकेशनवर असल्याचे दिसते आहे. गोल्डन रंगाच्या साडीत असलेली उर्फी नेहमीसारखीच बोल्ड दिसते आहे. त्याच रंगाचा ब्लाऊज तिने घातला आहे. उर्फी कॅमेऱ्यात पाहून अश्लील इशारे करते आहे. ‘माझे माझ्या स्तनांवर प्रेम आहे’, असे या व्हिडिओत ती म्हणते आहे.
तिचा हा व्हिडीओ पाहून नेटकरी चांगलेच संतापले आहेत. “हिच्या डोक्यावर परिणाम झाला आहे का? हिच्या आयुष्यात काय चुकीचं घडलंय हेच समजत नाही”, अशी कमेंट एका नेटकऱ्याने केली आहे. तर एकाने ‘सस्ता नशा’ असे कमेंट करत म्हटले आहे. तर “कोणीतरी हिला उचलून फेकून द्या” अशी प्रतिक्रिया एकाने व्यक्त केली आहे.
Model Urfi Javed Bold Statement on Boobs Video Viral