इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – अभिनेत्रीपेक्षाही मॉडेल म्हणून ओळख असलेली ऊर्फी जावेद ही कायमच चर्चेत असते. किंबहुना यासाठी ती काही न काही अतरंगी करताना दिसते. ऊर्फी आणि कपड्यांचा तसा ३६ चाच आकडा आहे. त्यामुळे कपड्यांच्या मुद्द्यावरून ती कायमच ट्रोल होत असते. अशा या ऊर्फीने नुकतेच एक नेक काम केले आहे. यामुळे तिचे कौतुकही होत आहे.
नेमकं काय घडलं?
ऊर्फीच्या एका निर्णयामुळे तिने चाहत्यांचं मन जिंकून घेतलं. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या एका वृद्ध व्यक्तीचा व्हिडिओ पाहून ऊर्फी त्या व्यक्तीच्या मदतीला धावून गेली आहे. एवढंच नव्हे तर या आजोबांना ती दरमहा काही रक्कम देखील देणार आहे.
ऊर्फीने काही दिवसांपूर्वी तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली होती. ज्यात एक ९५ वर्षीय आजोबा रोजच्या जेवणासाठी लग्नात ताशा वाजवत होते. हा व्हिडिओ ऊर्फीने तिच्या इन्स्टा स्टोरीमध्ये शेअर केला. रोजच्या रोजीरोटीसाठी ते आजोबा घेत असलेले कष्ट पाहून ऊर्फी सुन्न झाली होती. तिने तातडीने इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये पोस्ट करत असे लिहिले की, ‘कोणाकडे यांचा नंबर किंवा पत्ता असेल तर पाठवा’.
हा व्हिडिओ एका इन्स्टाग्राम पेजवरुन शेअर करण्यात आलेला. ते पेज हँडल करणाऱ्या व्यक्तीशी ऊर्फीने संपर्क साधला आणि त्यांच्या मदतीने तिने त्या आजोबांशी संपर्क साधला. उर्फीने त्यांना तात्काळ काही पैशांची मदत केली आणि दर महिन्याला थोडेफार पैसे नियमित देणार असल्याचेही उर्फीने सांगितले. यानंतर ऊर्फीने अलीकडेच तिला या व्यक्तीपर्यंत पोहोचण्यासाठी मदत करणाऱ्या पांडे या व्यक्तीचे आभार मानणारी पोस्टही इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये शेअर केली आहे.
ज्या पेजवरुन त्या ९५ वर्षीय आजोबांचा व्हिडिओ शेअर करण्यात आलेला त्यांनीही उर्फीचे आभार मानणारी पोस्ट इन्स्टाग्रामवर शेअर केली होती. या व्यक्तीने असे लिहिले होते की, ‘प्रसिद्ध अभिनेत्री उर्फी जावेदमुळे आमच्या आजोबांची थोडी मदत झाली. जेव्हा उर्फीसारखी दयाळू आणि मदत करणारी एखादी व्यक्ती मदतीसाठी पुढाकार घेते, तेव्हाच आम्ही सर्वांपर्यंत मदत पोहचवू शकतो. मदतीबद्दल खूप खूप धन्यवाद!’
Model Uorfi Javed Senior Citizen Financial Help