विशेष प्रतिनिधी, मुंबई
कितीही महागाई आली तरीही मोबाईलची खरेदी कधीच थांबत नाही. अगदी लॉकडाऊनमध्येही लोकांनी आनलाईन खरेदी केली, पण मोबाईलचे मार्केट जोरात होते. परंतु, सर्व मोबाईल कंपन्या आता डिस्काऊंटच्या स्पर्धेतही उतरल्या आहेत. सध्या फ्लिपकार्टवर मोबाईल बोनान्झा सेल सुरू आहे. यात रिअलमी, सॅमसंग आदी कंपन्यांचे मोबाईल डिस्काऊंटसह उपलब्ध आहेत. फ्लिपकार्टने हा सेल फक्त 24 जूनपर्यंत ठेवला असून यात मोबाईल कंपन्यांपेक्षा कर्ज देणाऱ्या बँकांकडून मोठे डिस्काऊंट्स दिले जात आहेत. नो-कॉस्ट ईएमआय आणि एक्स्चेंज आफरदेखील सुरू आहे.
Realme Narzo 30a
Realme Narzo 30a हा स्मार्टफोन केवळ 8 हजार 249 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. त्यावरही एचडीएफसी बँकेच्या वतीने 10 टक्के डिस्काऊंट दिला आहे. याशिवाय 7 हजार 700 रुपयांपर्यंत एक्स्चेंज आफरही कंपनीने दिले आहे. सोबतच 1 हजार 375 रुपयाच्या मासिक हफ्त्यावर हा मोबाईल खरेदी करता येणार आहे. या मोबाईलमध्ये MediaTek Helio G85 प्रोसेसर आणि 6000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. फोनमध्ये एकूण तीन कॅमेरे आहेत.
POCO M3 Pro 5G
पोको एम3 प्रो 5G स्मार्टफोन फ्लिपकार्ट च्या सेलमध्ये 13 हजार 999 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. एक्सीस बँकेने या फोनच्या खरेदीवर 5 टक्के कॅशबॅक डिस्काऊंट दिलेला आहे. 2 हजार 334 रुपयांच्या नो-कॉस्ट ईएमआयवर हा फोन खरेदी करता येणार आहे. पोको एम3 प्रो 5G मध्ये 6.5 इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले आहे. त्याचे रिझोल्युशन 1080 × 2400 पिक्सल एवढे आहे.
SAMSUNG Galaxy A32
सॅमसंग कंपनीचा हा फोन सेलमध्ये 24 हजार 999 रुपयांएवजी 20 हजार 499रुपयांना उपलब्ध आहे. हा फोन नो-कॉस्ट ईएमआय व 15 हजार 300 रुपयांच्या मासिक हफ्त्यावर खरेदी करता येईल. एचडीएफसीच्या वतीने या फोनवर 1500 रुपयांचा डिस्काऊंटही देण्यात आलेला आहे.
Vivo V20 2021
Vivo चा V20 2021 स्मार्टफोन फ्लिपकार्ट च्या सेल मध्ये 27,990 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. एचडीएफसीने यावर 10 टक्के डिस्काऊंट ठेवलेला आहे. 15 हजार 300 रुपयांची एक्स्चेंज आफर यावर देण्यात आली आहे. तर 4 हजार 665 रुपयांच्या मासिक हफ्त्यावर मोबाईल खरेगी करता येणार आहे.