नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – रेल्वे प्रवासात भाजपच्या दोन आमदारांचे मोबईल चोरीली गेल्याच्या घटना घडल्या आहे. या दोन्ही घटना वेगवेगळ्या ठिकाणी व रेल्वेतल्या असून त्यामुळे रेल्वे प्रवासात होणा-या चोरीचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे. पहिली घटना नंदीग्राम एक्स्प्रेसमध्ये घडली. या रेल्वेतून नांदेड येथील भाजप आमदार राम पाटील रातोळीकर हे प्रवास करीत चोरट्यांनी मनमाड येथे त्यांचा व पीएचा मोबाईल लंपास केला. तर सहप्रवाशाची कॅश असलेली पर्सही चोरली. ही बाब नाशिक येथे लक्षात आली. त्यामुळे हा गुन्हा नाशिक रेल्वे पोलिसांनी दाखल केला. या चोरीप्रकरणात मालेगाव येथून आरोपींना अटक करण्यात आली आहे. पण, त्यांच्याकडून आमदारांचा मोबाईल मिळाला नाही. त्यांच्यासोबत असणारे पीएचा मोबाईल व सहप्रवाशांकडून चोरलेली कॅशची पर्स मात्र या चोरट्यांकडून मिळाल्याची माहिती पोलिसांनी दिली. तर दुसरी घटना देवगिरी एक्स्प्रेस मध्ये घडली. या रेल्वेतून परभणीच्या आमदार मेघना साकोरे- बोर्डीकर या प्रवास करत होत्या. त्यांचा मोबाईल या प्रवासात चोरीला गेला. या चोरीप्रकरणी मनमाड रेल्वे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आठ दिवसात या दोन्ही घटना घडल्या. रेल्वे प्रवासा दरम्यान चोरी होण्याचे प्रकार नवीन नाही. या अगोदर माजी मुख्यमंत्री कै. शंकरराव चव्हाण यांचे मनमाड येथे चोरट्यांनी पाकीट लंपास केले होते. त्यामुळे रेल्वे प्रवासात होणारी चोरी हा विषय तेव्हा चर्चेचा होता. आता आमदारांचे मोबाईल चोरीला गेल्यामुळे पुन्हा रेल्वेच्या या चो-या चर्चेत आल्या आहे.