पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सध्या मोबाइल हा जणू जीवनाचा अविभाज्य भाग असल्यासारखे सर्व जण वागत असतात. कोणाशीही संपर्क साधण्यापासून ते मनोरंजनापर्यंत या मोबाइलवर प्रत्येक जण अवलंबून असल्याचे दिसून येते, परंतु या मोबाइलचे जितके फायदे आहेत त्याहून अधिक तोटे देखील आहेत. या मोबाइलच्या अतिवापरामुळे तरुण वयातच अनेकांना कानांचे, डोळय़ांचे अनेक आजार होतात, मोबाईल मधून इलेक्ट्रो मॅग्नेटिक रेडिएशन निघतात, त्यामुळे शरीरावर दुष्परिणाम होतात. तसेच मोबाईलच्या कव्हरमध्ये नोटा ठेवल्यामुळे स्फोट होऊ शकतो. कारण कोणत्याही नोटेमध्ये केमिकल तथा रसायन चा वापर केलेला असतो. त्यामुळे मोबाईलच्या कव्हर मध्ये नोट ठेवणे धोकादायक ठरते.
थेट जीवाला धोका
मोबाईलचे हँडसेट विविध प्रकारचे विविध रंगाचे आणि आकाराचे असतात त्याचप्रमाणे कव्हर देखील आकर्षक घेण्याकडे कल असतो. विशेष म्हणजे या कव्हरच्या पाठीमागे कोणी फोटो ठेवतात तर काहीजण पैसे म्हणजे नोटा देखील ठेवतात. परंतु या नोटा ठेवणे चांगली गोष्ट नाही. सध्या अनेकांच्या मोबाईल फोनच्या कव्हरमध्ये १०, ५०, १००, २००, किंवा ५०० रुपयांची नोट ठेवलेली दिसून येते. फोनच्या कव्हरमध्ये ठेवलेले हे पैसे कदाचित एखाद्या कठीण प्रसंगी कामाला येतील असे अनेकांना वाटत असते. मात्र, अशा प्रकारे नोटा ठेवणे हे धोकादायक ठरू शकते. अगदी जीवाला देखील धोका पोहोचू शकतो.
स्फोटाची शक्यता
मोबाईल फोनचा अधिक वापर करता, तेव्हा हॅण्डसेट अधिक गरम होतो, ही बाब तुमच्या लक्षात आली असेल. फोन गरम होताच फोनची मागील बाजू जळू लागते. अशा परिस्थितीत, जर तुम्ही तुमच्या फोनच्या कव्हरच्या मागे एक नोट ठेवली असेल, तर फोनमधील उष्णतेचा मार्ग बंद होतो. त्यामुळे तो स्फोट होऊ शकतो. यामुळे मोबाईल फोनमध्ये घट्ट कव्हर वापरू नये, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. नोटेमध्ये असलेल्या केमिकलमुळे ही आग आणखी वाढू शकते. त्यामुळे मोबाईल फोन कव्हरच्या मागे चुकूनही कोणत्याही प्रकारची नोट ठेवू नका. मोबाईल फोनचे कव्हर अतिशय काळजीपूर्वक लावावे.
अतिवापराने याला आमंत्रण
मोबाईल फोनचा अतिवापर वाढला आहे. पण यासोबतच याचे दुष्परिणाम देखील तितकेच वाढले आहेत. मोबाईलच्या अतिवापरामुळे डोकेदुखी, टेन्शन, निद्रानाश आणि कानाच्या पडद्यावर वाईट परिणाम होतो. सध्याच्या काळात स्मार्टफोनच्या एका क्लिकवर सर्व गोष्टी सहज शक्य झाल्या आहेत. शॉपिंगपासून ते ऑनलाइन जेवण मागवण्यापर्यंत सर्वकाही स्मार्टफोनद्वारे शक्य आहे. याच कारणामुळे अनेकजण दिवसभर स्मार्टफोन वापरत असतात. अनेकांना स्मार्टफोनचे एकप्रकारे व्यसनच लागलेले असते, मोबाइल अतिप्रमाणात वापरणे धोक्याचे देखील ठरू शकते. मोबाइलमधून निघणारे रेडिएशन मानवी त्वचेला नुकसान पोहचवू शकते. केवळ फोनच नाही तर इतर इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसचे रेडिएशन धोकादायक असते. यामुळे डोळ्यांचा रेटिना कमकुवत होतो. तसेच, त्वचेला देखील नुकसान पोहचते. रेडिएशन आणि ब्लू लाइटमुळे त्वचा खराब होण्याची शक्यता असते. यामुळे त्वचेच्या चारही बाजूला काळे डाग पडतात. रेडिएशनमुळे त्वचा लाल होऊ शकते.
Mobile Phone Cover Currency Note Threat