नवी दिल्ली – पेगॅसस हेरगिरी प्रकरणामुळे पुन्हा एकदा सायबर गुन्हेगारीतून कसा बचाव करावा, यावर चर्चा सुरू झाली आहे. लॅपटॉप आणि डेस्कटॉपप्रमाणेच मोबाईलवरही सोप्या पद्धतीने मालवेअरचा हल्ला केला जाऊ शकतो. आयटी तज्ज्ञांच्या मतानुसार, मालवेअरपासून सुरक्षित राहण्यासाठी नेहमीच सतर्कता बाळगावी. किंवा फोन नेहमी फॉरमॅट करत राहावा.
नॅसकामने आपल्या अहवालात डार्कसाइड रॅनसमवेअरचा इशारा दिला होता. जगातील १५ देशांमध्ये रॅनसमवेअर लोकांकडून वसुली करतो. माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयाशी निगडित सीईआरटी-इनच्या माहितीनुसार, २०२० मध्ये भारतात ११.६ लाख सायबर हल्ले झाले होते. हे हल्ले २०१९ च्या तुलनेत तीन पटीने अधिक आहेत.
आयटी तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, सामान्य मालवेअरच्या लकवर क्लिक केल्यानंतर तो मोबाईलमध्ये प्रवेश करू शकतो. परंतु पेगॅससला मोबाईल फोनमध्ये घुसण्यासाठी क्लिक करण्याची गरज पडत नाही. फक्त मेसेजच्या माध्यमातून काम होते. हा मालवेअर फोनमधील प्रत्येक डाटाची कॉपी करतो. बोलणे ऐकण्यासाठी मोबाईल फोनचा कॅमेरा आणि मायक्रोफोनला ऑन करू शकतो.
भारतीय लॅपटॉप आणि डेस्कटॉपसाठी अँटिव्हायरस पॅक घेतला जातो. किंवा इतर उपाययोजना केल्या जातात. परंतु मोबाईलसाठी अशा कोणत्याही उपाययोजना उपलब्ध नाहीयेत. आजकालचे बहुतांश मोबाईल फोन लॅपटॉप आणि डेस्कटॉपपेक्षा अधिक प्रभावी असतात. याच पार्श्वभूमीवर मोबाईलसुद्धा आता सायबल हल्ल्याच्या निशाण्यावर आहे.
अँटिव्हायरस उत्पादन विक्री करणारी कंपनी नॉर्टनच्या अहवालानुसार, मालवेअरच्या हल्ल्यातून वाचविण्यासाठी अॅपल आयओएस चांगली सुरक्षा उपलब्ध करून देते. परंतु अॅपल फोनला हॅक केले जाऊ शकत नाही, असे समजू नका. डाटा चोरी करण्याच्या उद्देशाने अनेक अँड्रॉइड फोनमध्ये आधीपासूनच मालवेअर इन्स्टॉल असतात.
कोणता धोका
पगॅससचा वापर हेरगिरीसाठी करण्यात आला. परंतु माहिती तंत्रज्ञान तज्ज्ञांच्या माहितीनुसार, मालवेअर हल्लेखोर मोबाईल फोनला हॅक करून त्यातील डाटा चोरी करण्यासह युजर्सकडून फोनला फ्री करण्यासाठी पैसे मागू शकतात.
सुरक्षेचा उपाय
तज्ज्ञ सांगतात की, मोबाईल फोन सुरक्षेला जीवनाच्या जगण्याच्या शैलीचा भाग बनवून घ्यावे लागणार आहे. जागरूकता आणि सतर्कता या गोष्टींमुळे फसवणुकीच्या प्रकारातून वाचता येऊ शकणार आहे. फोन नियमितरित्या फॉरमॅट करावा. संवेदनशील डाटा फोनमध्ये ठेवू नये.