इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – भारतात याच महिन्यात 5G सेवा सुरू करण्याची तयारी दूरसंचार ऑपरेटर Jio, Airtel आणि Vi यांनी केली आहे. Jio आणि Airtel त्यांची 5G सेवा सर्वप्रथम सुरू होणार आहे. या वर्षाच्या शेवटी देशात सर्व कंपन्यांचे 5G लाँच झालेले असू शकते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलीकडेच सांगितले की 5G लवकरच येत आहे आणि त्याचा इंटरनेट स्पीड 4G सेवेच्या तुलनेत 10X असेल. अनेकांना प्रश्न पडला आहे की त्यांचा सध्याचा स्मार्टफोन 5G सेवेसाठी चालेल किंवा नाही. त्याची माहिती आपण आता जाणून घेणार आहोत…
5G लाँच होणार असल्याने तुम्हीही त्यासाठी तयार असले पाहिजे. यासाठी तुमच्याकडे 5G नेटवर्कला सपोर्ट करणारा स्मार्टफोन असणे सर्वात महत्त्वाचे आहे. त्यामुळे तुमचा फोन 5G नेटवर्कला सपोर्ट करत नसल्यास, तुम्हाला 10X स्पीडचा अनुभव घेण्यासाठी नवीन फोन खरेदी करावा लागेल. म्हणून आज आम्ही तुम्हाला एक खास मार्ग सांगत आहोत ज्याद्वारे तुम्ही जाणून घेऊ शकता की तुमचा 5G सपोर्ट करेल की नाही…
तुमचा फोन 5G नेटवर्कला सपोर्ट करतो की नाही हे कसे तपासायचे?
1: तुमच्या Android फोनवर, सेटिंग्ज अॅपवर जा
2: ‘वाय-फाय आणि नेटवर्क’ पर्यायावर क्लिक करा
3: आता ‘सिम आणि नेटवर्क’ पर्यायावर क्लिक करा
4: आता तुम्ही ‘प्राधान्य नेटवर्क प्रकार’ पर्यायाखालील सर्व तंत्रज्ञानाची सूची पाहू शकाल.
5: तुमचा फोन 5G ला सपोर्ट करत असल्यास, तो 2G/3G/4G/5G म्हणून सूचीबद्ध केला जाईल.
5G स्मार्टफोनची किंमत
तुमचा फोन 5G नेटवर्कला सपोर्ट करत नसल्यास, तुम्हाला हाय-स्पीड इंटरनेटचा अनुभव घेण्यासाठी 5G-सक्षम स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी पैसे खर्च करावे लागतील. Realme, Xiaomi सारख्या अनेक फोन कंपन्या आहेत ज्या आधीच परवडणारे 5G स्मार्टफोन ऑफर करतात. त्याच वेळी, बिझनेस स्टँडर्डच्या एका अहवालानुसार, क्वालकॉमने अलीकडेच सांगितले की भविष्यात 10 हजार रुपयांच्या खाली 5G फोन असतील.
Mobile Network 5G Service Existing Smartphone Support
Technology Tips Setting Android