इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – कोणत्याही गोष्टीचे व्यसन हे वाईटच असते, आजच्या काळात तरुण पिढीला मोबाईलचे व्यसन लागल्याचे म्हटले जाते. या व्यसनामुळे तरुण पिढी बरबाद होत असल्याचाही आरोप केला जातो. काही प्रमाणात हे खरे असल्याचे हेच वास्तव वादी सत्य असल्याचे दिसून येते. कारण लहान मुलांपासून ते तरुण पिढीपर्यंत अनेक जण या मोबाईलवर वेगवेगळे ॲप्स ओपन करून खेळत किंवा चॅटिंग करतात किंवा नानाविध प्रकारचे गेम खेळतात. पब्जी सारखे गेम नाहीतर तरुण-तरुणींना वेडच लावले आहे या वेडापायी अनेकांचा जीव गेल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यातच काही लाडाकोडात वाढलेली मुले, मुली आपल्या पालकांकडे मोबाईल घेण्याचा हट्ट करतात, परंतु मोबाईलचा योग्य पद्धतीने वापर होत नाही, असे दिसते
राजस्थानमध्ये असाच एक मुलीला पब्जी खेळण्यासाठी मोबाईल हवा होता, परंतु मोबाईल न मिळाल्याने तिने गळफास घेऊन आत्महत्या केल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. जयपूरमध्ये १८ वर्षीय तरुणीने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. वाढदिवसानिमित्त तिला PUBG खेळण्यासाठी नवा मोबाईल न दिल्याने सोडाळा परिसरात मुलीने गळफास लावून घेतला. याबाबत जयपूरचे वरिष्ठ पोलीस अधिकारी म्हणाले, बारावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीने तिचा वाढदिवस साजरा केला. यावेळी तिने PUBG खेळण्यासाठी तिच्या पालकांकडे मोबाईल फोन मागितला. त्यांनी नवीन फोन घेण्यास आता नकार देत बारावीची परीक्षा संपल्यानंतर घेऊ असे सांगितले. मुलीने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतल्याचे कळल्यावर नातेवाईकांना खूप वाईट वाटले. याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.